Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : राम मंदिर चोरी प्रकरणात मोठी घडामोड; चंपत राय यांचा महासचिवपदाचा राजीनामा

Marathi Breaking Live Updates : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरी प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच ट्रस्टमधील आणखी दोन सदस्यांनीही पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 06:00 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरी प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच ट्रस्टमधील आणखी दोन सदस्यांनीही पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभाराबाबत विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्ग होर्मुझ स्ट्रेटमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याचे वृत्त ब्रिटिश लष्कराने दिले. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) हल्ल्यात अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली मोहिम तात्पुरती स्थगित केली आहे. या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे ७.५ नॉटिकल मैल अंतरावर एव्हर लव्हली या मालवाहू जहाजावर हा हल्ला झाला. जहाजाच्या कंट्रोल रुमचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

The liveblog has ended.
  • 26 Jun 2026 05:50 PM (IST)

    26 Jun 2026 05:50 PM (IST)

    Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील

    पुणे : प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव, खानवडी आणि उदाचीवाडी येथील एकूण २५३.२१०९ हेक्टर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, याबाबतची अधिसूचना २३ जून २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तावित विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील एकूण २७५३.०५३ हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत प्रकरण ६ व कलम २ खंड (ग) च्या तरतुदी १० मार्च २०२५ रोजी लागू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी संयुक्त मोजणी अहवालानुसार १२१६.७५२३ हेक्टर क्षेत्रासाठी कलम ३२(१) अन्वये अधिसूचना यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • 26 Jun 2026 05:30 PM (IST)

    26 Jun 2026 05:30 PM (IST)

    Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला

    Nepal Tea Dispute with India 2026 : भारत आणि नेपाळ या दोन शेजारी देशांमधील व्यापारी संबंधांमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. चहाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या निर्यातीवरून दोन्ही देशांमधील वाद आता विकोपाला गेला असून, याचा थेट फटका नेपाळच्या चहा उद्योगाला बसला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सीमेवर लागू केलेल्या अत्यंत कडक नियमांमुळे नेपाळी चहाची भारतात होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. या गंभीर संकटामुळे नेपाळचे पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला यात हस्तक्षेप करावा लागला असून, आता हा प्रश्न सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवर वेगाने प्रयत्न सुरू झाले आहेत.

  • 26 Jun 2026 05:15 PM (IST)

    26 Jun 2026 05:15 PM (IST)

    ‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून (शुक्रवार 26 जून) बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

    माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “ते कोणालाही फोडू शकतात. आज आमदार, उद्या देवेंद्र फडणवीस, मग उद्या सांगतील चंद्रशेखर बावनकुळेयांना फोडणार आहेत. मला बावनकुळे आताच भेटून गेले. असं ते करूच शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भंग, गांजा, फोडाफोडीची कि मग ते काहीही बोलू शकतात, देवेंद्रजींना फोडतील, मग ते शेवटी सांगतील अमित शहांनाही फोडलं. अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर‘ पासून सर्वात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहील पाहिजे.”

  • 26 Jun 2026 05:01 PM (IST)

    26 Jun 2026 05:01 PM (IST)

    संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू

    छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली असून १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुढील दहा दिवसांत, तर २००० मिमी व्यासाची जलवाहिनी पंधरा दिवसांत कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या दोन्ही जलवाहिन्यांची स्वच्छता, हायड्रोलिक चाचण्या आणि आवश्यक क्रॉस कनेक्शनची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यात दररोज २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून सध्या सरासरी ४० एमएलडी पाणी उचलले जात आहे.

  • 26 Jun 2026 04:57 PM (IST)

    26 Jun 2026 04:57 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

    मीरा-भाईंदरमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला आहे. रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावरून अ‍ॅक्टिवा स्कूटरने प्रवास करत असताना स्कूटरच्या आतील भागातून अचानक एक साप बाहेर आल्याने वाहनचालकाची एकच तारांबळ उडाली. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:47 PM (IST)

    26 Jun 2026 04:47 PM (IST)

    महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

    मुंबईतील पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे गांधी मार्केट परिसरात पाहणीसाठी गेल्या असताना महापालिका कर्मचारी उघड्या ड्रेनमध्ये पडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली.

    या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे सांगत सखोल चौकशीचे आदेश दिले. कर्मचारी नेमका कशामुळे पडला, ड्रेन उघडा का होता आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:37 PM (IST)

    26 Jun 2026 04:37 PM (IST)

    ‘माझ्या मुलाला न्याय द्या…’, केतनच्या वडिलांच्या आक्रोशापुढे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रकरणात उज्वल निकम यांची एंट्री

    पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) घडलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agarwal) या तरुणाच्या हाय-प्रोफाइल हत्या प्रकरणात आता राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून अपघात झाल्याचा संशय असलेल्या या घटनेला पोलीस तपासात भयानक वळण आले होते. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच सिया गोयल तिच्या प्रियकराच्या मदतीने केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली आहे. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:27 PM (IST)

    26 Jun 2026 04:27 PM (IST)

    Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

    व्हेनेझुएलात दोन सलग विनाशकारी भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत २३५ जणांचा या नैसर्गिक आपत्तीत बळी गेला असून ४,३०० हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. अद्याप हजारो लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. तसेच बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान व्हेनेझुएलाला या संकटात आंतरराष्ट्रीय मदत पाठवण्यात आली आहे. भारताने देखील भूकंपानंतर ऑपरेशन अमिस्ताद सुरु केले आहे. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:17 PM (IST)

    26 Jun 2026 04:17 PM (IST)

    FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

    मेक्सिकोचा दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आपला शेवटचा सामना खेळून इतिहास रचला आहे. चेक रिपब्लिक विरुद्धच्या ‘अ’ गटातील सामन्यात ते ७७ व्या मिनिटाला मैदानात उतरला आणि विश्वचषकात मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. ओचोआने वयाच्या ४० वर्षे आणि ३४६ व्या दिवशी हा विक्रम केला. यासह, त्याने मेक्सिकोचे माजी कर्णधार राफा मार्केझ याचा विक्रम मोडला, ज्यांनी २०१८ च्या विश्वचषकात वयाच्या ३९ वर्षे आणि १३९ व्या दिवशी हा विक्रम केला होता. यासोबतच, त्याने प्रोफेशनल फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:08 PM (IST)

    26 Jun 2026 04:08 PM (IST)

    IND A Vs SL A Live: कर्णधार Dhruv Jurel चे वादळी शतक; श्रीलंकेच्या समोर उभा केला 452 रन्सचा डोंगर

    सध्या भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने शानदार शतकी खेळी केली आहे. श्रीलंका अ विरुद्ध त्याने शनदात शतकी खेळी केली आहे. ध्रुव जुरेल कर्णधार म्हणउण भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने ध्रुव जुरेलच्या खेळीच्या जोरवार 452 रन्सचा स्कोअर केला आहे. वाचा सविस्तर... 

  • 26 Jun 2026 04:00 PM (IST)

    26 Jun 2026 04:00 PM (IST)

    Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर

    सोशल मीडियावरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कन्टेन्ट क्रिएटर ‘लॉर्ड पुनीत’ उर्फ पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पुनीत सुपरस्टारचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. या बातमीमुळे इंटरनेटवर एकच खळबळ माजली असून त्याचे लाखो फॅन्स प्रचंड धक्क्यात होते. मात्र, एका ‘फॅक्ट चेक’ (Fact Check) दरम्यान ही बातमी पूर्णपणे खोटी, बनावट आणि केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुनीत सुपरस्टार अगदी सुरक्षित आणि ठणठणीत आहे. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:55 PM (IST)

    26 Jun 2026 03:55 PM (IST)

    JSW मोटर्सचा दिवाळीत मोठा धमाका

    सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू (JSW) ग्रुप आता ‘जेएसडब्ल्यू मोटर्स’ (JSW Motors) या नवीन ब्रँडसह भारतीय पॅसेंजर कार बाजारात अधिकृतपणे प्रवेश करत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच सणासुदीच्या काळात आपले पहिले वाहन सादर करणार आहे. या पहिल्या गाडीचे बुकिंग नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून, ग्राहकांना डिलिव्हरी २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या गाडीची एक्स-शोरूम किंमत ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पहिली गाडी कोणती असणार?

     

  • 26 Jun 2026 03:50 PM (IST)

    26 Jun 2026 03:50 PM (IST)

    सिया गोयलचा पोलिसांसमोर आणखी एक धक्कादायक खुलासा

    Ketan Agrawal Murder Case Update: पुण्यातील नामांकित व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हाय-प्रोफाइल हत्या प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे, ज्यामुळे पोलीस आणि सामान्य जनता दोघेही अवाक झाले आहेत. पोलीस चौकशीदरम्यान मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी, सिया गोयल हिने सांगितलेले कारण विश्वास ठेवण्यापलीकडचे आहे. सियाने मान्य केले की केतनचे केस नैसर्गिक नव्हते आणि तो केसांचा विग वापरायचा. सियाला केतनचा टक्कलपणा अजिबात आवडत नव्हता आणि तिला हे लग्न मोडायचे होते. परिणामी, तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:45 PM (IST)

    26 Jun 2026 03:45 PM (IST)

    Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे

    Indian Women’s Team: भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दरम्यान या स्पर्धेत श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तसेच भारताच्या सेमीफायनलच्या आशा अद्याप जिवंत आहेत. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:40 PM (IST)

    26 Jun 2026 03:40 PM (IST)

    Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO

    Highest Paid CEO: भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी असलेले शंखा मित्रा हे अमेरिकेतील एक प्रमुख रिअल इस्टेट कंपनी असलेल्या Welltower चे CEO आहेत. जागतिक स्तरावर इलॉन मस्कनंतर दुसरे सर्वात महागडे CEO म्हणून त्यांचा नंबर लागतो. ज्यांचं पॅकेज ८२१ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच आजच्या दरानुसार ७,७४९ कोटी रुपये इतकं आहे. जर आपण हा आकडा दिवसांच्या हिशोबाने पाहिला, तर शंख मित्रा दिवसाला २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतात. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क या यादीत अव्वल स्थानी असून, त्यांनी केवळ तंत्रज्ञान कंपन्यांमधीलच नव्हे, तर इतर सर्व उद्योगांमधील CEO ना देखील मागे टाकलं आहे. वाचा सविस्तर

     

     

     

  • 26 Jun 2026 03:35 PM (IST)

    26 Jun 2026 03:35 PM (IST)

    मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक?

    छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील विविध संवर्गातील २२२ रिक्त पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या प्रक्रियेवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात आले असतानाही प्रत्यक्षात सर्व पदांसाठी एकच प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे दोन किंवा अधिक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अपेक्षित संधी मिळणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 26 Jun 2026 03:30 PM (IST)

    26 Jun 2026 03:30 PM (IST)

    पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी

    सासवड : आगामी दोन आठवड्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी जात असून, याबाबत शासनाची संपूर्ण तयारी झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यापूर्वी चार ते पाच आढावा बैठका झाल्या असून, प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येत आहे. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:25 PM (IST)

    26 Jun 2026 03:25 PM (IST)

    राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठी घडामोड; चोरी प्रकरणानंतर तीन सदस्यांचे राजीनामे

    Ayodhya Ram Temple News Marathi : अयोध्या राम मंदिरातील प्रसादाच्या कथित चोरीप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनंतर, राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत गोपाल यांनीही राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांवर अद्याप कोणीही भाष्य करत नाहीये आणि कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ट्रस्टने दाखल केलेल्या एफआयआरनंतर, आठ आरोपींना संरक्षण देऊन त्यांच्या अटकेतून सुटका केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी ट्रस्टवर केला आहे. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:20 PM (IST)

    26 Jun 2026 03:20 PM (IST)

    व्हेनेझुएलाला भारताकडून वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

    व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाने प्रचंड विध्वंस घडवून आणला असून आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्या बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ४,३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मदतीचे आश्वासन दिले होते. यानंतर भारताने तातडीने भारतीय हवाई दलाची (IAF) दोन (C-17 विमाने मदतसाहित्यासह रवाना केली आहेत. या मदतसाठ्यामध्ये भारतीय हवाई दलाचे 'पॅरा फील्ड हॉस्पिटल', 'भीष्म' (BHISHM) क्यूब्स आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश असल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले.

    Operation Amistad underway!

    Two @IAF_MCC C17s took-off today for Venezuela with urgent assistance to support their post-earthquake relief efforts.

    The assistance contains an Indian Army @adgpi Field Hospital Unit and over 35 tons of relief supplies, medicines and medical… pic.twitter.com/Dcq8P065tp

    — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 26, 2026

  • 26 Jun 2026 03:15 PM (IST)

    26 Jun 2026 03:15 PM (IST)

    ‘टीव्हीएस एनटॉर्क १२५’ आपल्या नवीन रंगांसह लॉन्च

    टीव्हीएस मोटर कंपनीने आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन आपल्या लोकप्रिय ‘एनटॉर्क १२५’ स्कूटरचे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. कंपनीने या स्कूटरच्या ‘डिस्क’ आणि ‘रेस एडिशन’ या व्हेरियंट्सना नवीन रंग आणि आकर्षक ग्राफिक्ससह बाजारात आणले आहे. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:10 PM (IST)

    26 Jun 2026 03:10 PM (IST)

    FIFA World Cup 2026 मधून ‘या’ दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा

    मेक्सिकोचा दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आपला शेवटचा सामना खेळून इतिहास रचला आहे. चेक रिपब्लिक विरुद्धच्या ‘अ’ गटातील सामन्यात ते ७७ व्या मिनिटाला मैदानात उतरला आणि विश्वचषकात मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. ओचोआने वयाच्या ४० वर्षे आणि ३४६ व्या दिवशी हा विक्रम केला. यासह, त्याने मेक्सिकोचे माजी कर्णधार राफा मार्केझ याचा विक्रम मोडला, ज्यांनी २०१८ च्या विश्वचषकात वयाच्या ३९ वर्षे आणि १३९ व्या दिवशी हा विक्रम केला होता. यासोबतच, त्याने प्रोफेशनल फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 03:05 PM (IST)

    26 Jun 2026 03:05 PM (IST)

    EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद

    मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा आणि डेटाबेस एकत्रिकरणाचे काम हाती घेत असल्याने २६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत ईपीएफ दावे दाखल करणे व त्यांची प्रक्रिया करणे तात्पुरते बंद राहणार आहे. ही माहिती ईपीएफओने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. वाचा सविस्तर

  • 26 Jun 2026 02:59 PM (IST)

    26 Jun 2026 02:59 PM (IST)

    पावसामुळे रायगडकारांना मोठा दिलासा

    रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील २८ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण साठा १८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा साठा सुमारे १३ टक्के होता. वावे धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून सुतारवाडी, आंबेघर, भिलवले आणि मोरबे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

  • 26 Jun 2026 02:51 PM (IST)

    26 Jun 2026 02:51 PM (IST)

    राधानगरी धरणात 17 टक्के पाणीसाठा

    कोल्हापुरातील राधानगरी धरणाने तळ गाठलाय. या धरणात केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे धरणातून पाणी उपसा बंद करण्यात आलंय. आज 26 जून उजाडला तरी राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे कोल्हापुरात पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

  • 26 Jun 2026 02:41 PM (IST)

    26 Jun 2026 02:41 PM (IST)

    उद्धव ठाकरेंना दौ-यातून काय मिळणार? - गुलाबराव पाटील

    उद्धव ठाकरेंच्या दौ-यावर शिवसेना नेत्यांकडून टीका केली जातेय. मुलाला जमत नाही तर वडिलांनी तरी दौरे करावे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केलीय. तर उद्धव ठाकरेंना दौत्यातून काय मिळणार आहे, असा सवाल मंत्री संजय शिरसाटांनी केलाय. दरम्यान मूळ प्रश्नाकडे बगल देणं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव असल्याचं शिरसाटांनी म्हटलंय

  • 26 Jun 2026 02:30 PM (IST)

    26 Jun 2026 02:30 PM (IST)

    राम मंदिराला शिवसेनेने दिलेली चार किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊत यांचा संताप

    अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे! असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • 26 Jun 2026 02:20 PM (IST)

    26 Jun 2026 02:20 PM (IST)

    लोहगड दुर्घटनेनंतर केतन अग्रवालच्या कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

    लोहगड किल्ल्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात सिया गोयलने केतनला कड्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

  • 26 Jun 2026 02:11 PM (IST)

    26 Jun 2026 02:11 PM (IST)

    सामंतांच्या ऑफरवर वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण; काँग्रेसशी निष्ठा कायम असल्याचा पुनरुच्चार

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्या ऑफरबाबत सुरू असलेल्या चर्चावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सत्ता किंवा पदासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच बदनामीचे राजकारण थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  • 26 Jun 2026 01:54 PM (IST)

    26 Jun 2026 01:54 PM (IST)

    पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट

    काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनच्या पावसाने अद्याप अपेक्षित जोर धरला नसल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेशी पाण्याची आवक झालेली नाही. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून केवळ ३.७८ टीएमसी म्हणजेच १२.९८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 26 Jun 2026 01:43 PM (IST)

    26 Jun 2026 01:43 PM (IST)

    मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल! २८-२९ जूनला विस्तार; शिंदे गटाला दिल्लीत मोठी लॉटरी

    केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार (२८ जून) किंवा सोमवारी (२९ जून) आपल्या मंत्रिमंडळात बदल करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. सरकारने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, २३ जून रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आले आहे.

  • 26 Jun 2026 01:34 PM (IST)

    26 Jun 2026 01:34 PM (IST)

    मनसे नेते संदीप देशपांडे यांचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप

    मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संदीप देशपांडे यांनी थेट एक फोटो प्रसिद्ध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री आणि पोलिसांकडे केली आहे. संदीप देशपांडे यांनी, 10 कोटींची केबल चोरी आणि फरार आरोपीचं कनेक्शन सांगितलं आहे. हे असे लोक खरोखर असतील तर ते खासदारांसोबत काय करत आहेत? काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला होता ती गाडी याच व्यक्तीच्या नावावर आहे का? या व्यक्तीचा खासदारासोबत फोटो आहे. माझी माहिती आहे की ही व्यक्ती गुन्हेगारीमध्ये आहे, असा आरोप त्यांनी केला.

  • 26 Jun 2026 01:23 PM (IST)

    26 Jun 2026 01:23 PM (IST)

    सोलापूर महापालिकेच्या निवडणूक खर्चात वाढ; स्थायी समिती सभापतींकडून बिलावर आक्षेप

    नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत झालेल्या खर्चावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीतील विविध कामासाठी 1 कोटी 70 लाख असताना पालिकेला चक्क 6 कोटी 70 लाख रुपयांची बिलं सादर केली आहेत. सादर बिलात तब्बल 4 पटीने रक्कम वाढल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. अचानक वाढलेल्या कामामुळे बिलं वाढल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून केला जातोय. यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी समिती गठीत करत चौकशीचा आदेश दिला आहे.

  • 26 Jun 2026 01:16 PM (IST)

    26 Jun 2026 01:16 PM (IST)

    राम मंदिराला शिवसेनेने दिलेली चार किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊत यांचा संताप

    अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे! असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • 26 Jun 2026 01:07 PM (IST)

    26 Jun 2026 01:07 PM (IST)

    लोहगड दुर्घटनेनंतर केतन अग्रवालच्या कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

    लोहगड किल्ल्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात सिया गोयलने केतनला कड्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

  • 26 Jun 2026 12:48 PM (IST)

    26 Jun 2026 12:48 PM (IST)

    महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

    दौंड नगरपरिषद कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दौंड नगरपालिकेत कार्यरत महिला अधिकारी आहेत. घटनेतील आरोपी गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही), याने दिनांक २२ जून २२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात येऊन महिला अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या केबिनबाहेर उभे राहून अश्लील शिवीगाळ केली. तसेच आक्षेपार्ह हावभाव करून महिला अधिकाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

     

  • 26 Jun 2026 12:36 PM (IST)

    26 Jun 2026 12:36 PM (IST)

    कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

    जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नदीपात्र परिसरात मागील काही दिवसांपासून कृषी पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात सिंचनासाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  • 26 Jun 2026 12:24 PM (IST)

    26 Jun 2026 12:24 PM (IST)

    पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

    खराडी भागात कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 26 Jun 2026 12:12 PM (IST)

    26 Jun 2026 12:12 PM (IST)

    दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला

    घरच्यांचा निरोप घेत, व्यवसाय वाढविण्याची स्वप्ने उराशी बाळगत सहा जण बुधवारी रात्री दिल्लीकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी नव्या मशीनरीची खरेदी करून परत येण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि क्षणार्धात कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. संभाजीनगरात ही बातमी धडकताच व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. राजेंद्र भावराव कवडे (वय ४६), संदीप नवनाथ बोरसे (वय ३५), सचिन गंगाधर गजभारे (वय ३७) आणि रवींद्र भागवत काळे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. अब्दुल खलील अब्दुल समद (वय ३०) आणि उमर इस्माईल जागीदार (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

  • 26 Jun 2026 11:45 AM (IST)

    26 Jun 2026 11:45 AM (IST)

    पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

    पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी आणि पारगाव येथील औद्योगिक क्षेत्र विकासासाठी आवश्यक जमिनी संपादित करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत ही अधिसूचना २३ जून २०२६ रोजी राज्य राजपत्राच्या असाधारण अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • 26 Jun 2026 11:35 AM (IST)

    26 Jun 2026 11:35 AM (IST)

    २६ जूनला का साजरा केला जातो ‘छळाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस’? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    मानवी सभ्यता कितीही प्रगत झाली असली, तरी जगाच्या पाठीवर आजही अनेक ठिकाणी छळ आणि अमानवीय वागणुकीच्या घटना घडताना दिसतात. कोणत्याही व्यक्तीला दिली जाणारी शारीरिक किंवा मानसिक यातना ही केवळ त्याच्या शरीरालाच नव्हे, तर त्याच्या मनाला आणि आत्म्यालाही खोलवर मानसिक आघात (Mental Trauma) पोहोचवते. याच गंभीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि छळाला बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी दरवर्षी २६ जून रोजी जगभरात ‘छळाच्या बळींच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस’ (International Day in Support of Victims of Torture) पाळला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आदराने जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे.

  • 26 Jun 2026 11:30 AM (IST)

    26 Jun 2026 11:30 AM (IST)

    PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा

    नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) मॉलेडवर सविस्तर चर्चा झाली. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचवली, नागरिकांचे जीवन कसे सुलभ झाले आणि आर्थिक सेवांच्या समावेशनला कशी चालना मिळाली या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

  • 26 Jun 2026 11:29 AM (IST)

    26 Jun 2026 11:29 AM (IST)

    चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान ओव्हरहेट वायर तुटली; पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली

    पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट - मुंबई सेंट्रल दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने सकाळच्या सत्रात वाहतूक खोळंबली होती. दरम्यान हा भागात दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

  • 26 Jun 2026 11:25 AM (IST)

    26 Jun 2026 11:25 AM (IST)

    भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी

    भोसरी विधानसभा २०७ मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले

  • 26 Jun 2026 11:15 AM (IST)

    26 Jun 2026 11:15 AM (IST)

    ‘नवा अध्याय…’ Vaibhav Sooryavanshi ची पदार्पणापूर्वी घोषणा, सोशल मीडिया पोस्टने खळबळ

    सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी ही आहे की, युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार की नाही? अवघ्या १५ वर्षांच्या या खेळाडूने आपल्या फलंदाजीने अशी खळबळ उडवून दिली की निवड समितीला त्याला संघात स्थान देणे भाग पडले. शुक्रवारी बेलफास्टमध्ये सुरू होणारी दोन सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघात मोठे बदल घडवून आणणार आहे.

  • 26 Jun 2026 11:10 AM (IST)

    26 Jun 2026 11:10 AM (IST)

    ‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन…’, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

    मागील काही काळापासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण जास्तच चर्चेत आहे. केतन हा एक व्यावसायिक असून त्याला ट्रेकिंगची फार आवड होती. केतनचा सिया गोयल नावाच्या मुलीसोबत फ्रेब्रुवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. दोघेही नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते, यासाठी कोट्यवधी रुपयांचा हाॅल देखील बुक करण्यात आला होता पण याआधीच केतनचा वाईट शेवट झाला. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते ज्यामुळे चेतन नावाच्या बाॅयफ्रेंडसोबत मिळून तिने लोहगडावर केतनची हत्या करण्याचा कट रचला. आपल्या तीन संधीत अयशस्वी झाल्यानंतर सियाने चाैथ्यांदा केतनला गडावरुन ढकलण्याचा प्रयत्न केला ज्यात ती सफल झाली. केतनच्या मृत्यूनंतर तिने ही हत्या अपघाती असल्याचा बनाव रचला पण पोलिसांच्या तपासात काही दिवसांतच सर्व घटना उघडकीस आली.

  • 26 Jun 2026 11:05 AM (IST)

    26 Jun 2026 11:05 AM (IST)

    व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

    व्हेनेझुएलात ४० सेकंदात झालेल्या सलग दोन भूकंपामुळे मोठ्या जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपाने हजारो लोकांना बेघर केले असून मृतांचा आकडा २०० पार झाला आहे.अनेक भागांमध्ये बहुमजली इमारती पडल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. इमारतीच्यां ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.

  • 26 Jun 2026 10:40 AM (IST)

    26 Jun 2026 10:40 AM (IST)

    नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ

    टेक कंपनी सॅमसंगने भारतात गुरुवारी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy A27 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने भारतासह दुसऱ्या ग्लोबल मार्केटमध्ये देखील Galaxy A सीरीजअंतर्गत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 4 रंगात उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिज-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

  • 26 Jun 2026 10:30 AM (IST)

    26 Jun 2026 10:30 AM (IST)

    व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

    काराकस : व्हेनेझुएलात ४० सेकंदात झालेल्या सलग दोन भूकंपामुळे मोठ्या जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपाने हजारो लोकांना बेघर केले असून मृतांचा आकडा २०० पार झाला आहे.अनेक भागांमध्ये बहुमजली इमारती पडल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. इमारतीच्यां ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.

  • 26 Jun 2026 10:20 AM (IST)

    26 Jun 2026 10:20 AM (IST)

    राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ

    संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे ते भीषण दृश्य आणि न्यायासाठीची ऐतिहासिक कायदेशीर लढाई पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये जिवंत होणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी गुरुवार, २५ जून २०२६ रोजी राजकुमार रावच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित केला. हा चित्रपट भारताचे सर्वात प्रसिद्ध आणि धाडसी सरकारी वकील, उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. या टीझरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. १ मिनिट ५४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचे उल्लेखनीय परिवर्तन आणि त्याचा अभिनय दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या अंगावर शहारे येत आहेत आणि लोक त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी भविष्यवाणी करत आहेत.

  • 26 Jun 2026 10:10 AM (IST)

    26 Jun 2026 10:10 AM (IST)

    कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

    जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title: Marathi live blog breaking news live updates in marathi top news international and national news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Marathi Breaking news
  • Navarashtra Live Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.