या घटनेच्या निषेधार्त राष्ट्रवादी चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शहरातुन निषेध रँली काढत केंद्र सरकारचा निषेध केला, यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पांठीबा म्हणुन म्हसवड शहर बंद चे आवाहन करण्यात आले होते, त्याला शहरातील व्यापार्यांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली.
म्हसवड शहरातील छ. शिवाजी चौक येथे सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन निषेध रँलीची सुरुवात केली यावेळी भारत माता की जय, इनक्लाब जिंदाबाद, पोलीस अत्याचाराचा निषेध असो, वुई वॉंट जस्टिस अशा घोषणा देत संपूर्ण शहरातुन हि निषेध रँली काढण्यात आली.
यावेळी म्हसवड च्या अपर तहसिलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात येवुन हे निवेदन शासनापर्यंत पोहचवण्याची विनंती या आंदोलकांनी केली, यावेळी विविध विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषणे करताना केंद्र शासनाचा व पोलीस अत्याचाराचा निषेध केला.
यावेळी किशोर सोनवणे, तेजसिंह राजमाने, आंगुली बनसोडे, संजय पाटील, हनुमंत ढवण, निलेश सरतापे, महेश करचे, ऋषी जगताप, दिलीप तुपे, आजिनाथ केवटे, राजकुमार डोंबे, स्वयंम शिर्के, बाळासाहेब माने, अशोक काळे, विश्वजीत केंगार, सचिन लोखंडे, परेश व्होरा, संव्यम जगताप, विश्वजीत केंगार, विनय जगताप, सतीश जगताप, राहुल कोथळे, साहेबराव वगरे, विकास जगताप, चैतन्य काळे, गौरव देवकुळे आदीजण उपस्थित होते.






