मुंबई– महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या हिंदू जनजागृती मोर्च्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्र सरकारला (State government) खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला जर मोर्च्यावर किंवा राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण राखता येत नसेल तर, मग तुमची गरजच काय? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, “राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टिका केली आहे.
काय म्हणाले राऊत?
शिंदे-फडणवीस सरकार राज्यात बेकायदेशीरपणे आले आहे, तेव्हापासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. काल सर्वोच्य न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कोर्टाबरोबर आता ‘जनता देखील शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, त्यामुळं हे सरकार किती व कसे चालते याचा अंदाज येईल. कायदा सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत याचाच प्रत्यय संभाजीनगरमध्ये दिसतोय. संभाजीनगर राडा झाला आहे, या सरकराचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचं दिसून आले, असं म्हणत संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील जनता या सरकारला नपुसक, बिनकामाचे असे म्हणत आहेत. आता यामागे तर आम्ही नाहीत. जर सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारविषयी हे निरीक्षण आहे, तर यावरून सरकारची प्रत, प्रतिष्ठा काय आहे? हे सरकार सत्तेवर कशाप्रकारे आले? आणि काम करतेय हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झाले”, असे संजय राऊत म्हणाले.
आतापर्यंत न्यायालयाने सरकारविषयी नपुंसक शब्द वापरला नव्हता
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात सध्या काय सुरु आहे, हे समजत नाही. दोन गटात हाणामारी, राडा होतो हे गंभीर आहे, यातून कायदा व सुव्यवस्था आबाधित नसल्याचं दिसतं. दरम्यान, विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची रोज जाणीव करून देत आहेत. बसू का, खाऊ का, जेऊ का, उठू, डोळे मिटू का, डोळे उघडू का, बोलू का, वाचू का, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर हल्लाबोल केला. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुंसक असा शब्द वापरला नव्हता. आम्ही नेहमी सांगतोय की हे सरकार अस्तित्वातच नाही. महाराष्ट्रात विविध मार्गानी जातीय आणि धार्मिक तणाव वाढावे, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहण्यासाठी हे सरकार राजकारण करतंय”, असेही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला.
काय म्हणाले सर्वोच्य न्यायालय?
महाराष्ट्रात ४ महिन्यांत निघालेले हिंदू जनजागृती मोर्चे व द्वेषपूर्ण भाषणांविरोधात केरळचे याचिकाकर्ते शाहिन अब्दुल्ला यांनी द्वेषपूर्ण भाषणांबाबत काेर्टाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन झाल्याबद्दल अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि न्या.बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी नेत्यांनी राजकारणात धर्माचा वापर थांबवला तर राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ थांबून आपोआपच विखारी भाषणे-वक्तव्ये बंद होतील, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले. तुम्हाला जर मोर्च्यावर किंवा राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण राखता येत नसेल तर, मग तुमची गरजच काय? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. तसेच सरकारला न्यायालयाने नपुंसक म्हणाले आहेत.
दानवेंकडून MIMवर आरोप…
संभाजीनगर शहरातील (Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura Dangal) परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.