243 हेक्टरला साताऱ्यात अवकाळी पावसाचा फटका, 600 शेतकऱ्यांचे नुकसान (फोटो सौजन्य-Gemini)
फलटण तालुक्यात डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला असून सुमारे 107 हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा बाधित झाल्या आहेत. खंडाळा तालुक्यात गहू आणि आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच खटाव, फलटण, मान आणि कराड परिसरात ज्वारी, कांदा, हरभरा आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेतल्यास डाळिंब 111 हेक्टर, गहू 47 हेक्टर, आंबा 32 हेक्टर, ज्वारी 21.17 हेक्टर आणि कांदा सुमारे 10 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका किमान पाच कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे 412 शेतकऱ्यांना थेट फटका बसला असून एप्रिल महिन्यातही आंब्याच्या सुमारे 14 हेक्टर बागांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यात सुमारे 10 हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली आहेत.
दरम्यान, कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून महसूल विभागालाही तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांचे पशुधन दगावले आहे, अशा शेतकऱ्यांना तात्पुरती मदत देण्यात आली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे. या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे जामवाडी गावात आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामवाडीचे शेतकरी विजय वाडेकर यांनी आपल्या शेतात अंदाजे १,८०० आंब्याची झाडे लावली होती. यावर्षी अंदाजे १० ते १२ टन आंब्याचे उत्पादन होईल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे जमिनीवर पडले.
आता उत्पादन केवळ १ ते २ टन होईल असा त्यांचा अंदाज आहे. विजय वाडेकर यांच्या मते, येत्या काही दिवसांत पाऊस आणि जोरदार वारे असेच सुरू राहिल्यास, उरलेले आंबेही पडू शकतात, ज्यामुळे १००% नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीमुळे अंदाजे १.२ दशलक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा तयार करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात






