कॅनडा येथे सुरू असलेल्या ज्युनियर स्क्वॅश विश्वचॅम्पियनशिपमध्ये अनाहत सिंगने इजिप्तच्या रुकाया सालेमला पहिल्या सेटमध्ये ११-३ ने पराभूत केले आणि त्यानंतर दुसरा सेटही ११-७ ने जिंकला. त्यानंतर, सर्वांच्या नजरा तिसऱ्या सेटवर होत्या, जो अनाहत सिंगने ११-९ ने जिंकून विजेतेपद पटकावले. २००५ मध्ये जोशना चिनप्पा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु तिचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत सिंग ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब समेहला ११-३, ८-११, ११-४, ११-६ असे हरवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या अनाहतने गेल्या वर्षी कांस्य पदक जिंकले होते.
युवा खेळाडू अनाहतच्या विजयानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी त्याचे अभिनंदन केले. आपल्या एक्स हँडलवर सामन्याच्या अंतिम क्षणांचा व्हिडिओ शेअर करत मांडविया यांनी लिहिले, ‘इतिहास घडला आहे! वर्ल्ड स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारी पहिला भारतीय ठरल्याबद्दल अनाहत सिंगचे मनःपूर्वक अभिनंदन! ही उत्कृष्ट कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’
History Made! 🇮🇳 Congratulations to Anahat Singh (@Anahat_Singh13) on becoming the first Indian ever to win the World Squash Junior Championship. A phenomenal achievement and a proud moment for every Indian. pic.twitter.com/SfURD0Zg69 — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 25, 2026
लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये स्क्वॅशचा समावेश करण्यात आला आहे. या विजयामुळे ज्युनियर स्तरावर आपले कौशल्य दाखवल्यानंतर, अनाहत सिनियर स्तरावरही तशीच कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. अनाहत सध्या सिनियर पीएसए टूरच्या जागतिक क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे, त्याला आपली क्रमवारी आणखी सुधारण्याची संधी अजूनही आहे.
IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत






