मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर त्यांनी शिंदे गट स्थापन करत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पदभार स्विकारला तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी जबाबदारी घेतली. आमदारांच्या (MLA) बंडानंतर आता खासदार आणि नगरसेवकांनी (MP and corporators) शिंदे गटात सामील होण्याचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे या दोघांनी शपथ घेऊन एका महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात भाजपाच्या नऊ तर शिंदे गटातील नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. तसेच बिनखात्याचे मंत्री आहेत अजून खातेवाटप झाले नाहीय, यावर विरोधकांनी टिका केली आहे.
[read_also content=”मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-eknath-shinde-says-that-the-leader-who-fought-for-the-maratha-community-was-lost-nrps-315817.html”]
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टिका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, जास्तीत जास्त सहा महिने हे सरकार टिकेल, मनाने ही लोकं एकत्र आली नाहीत, इडीची व केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवत भाजपाने हे सरकार तयार केले आहे, तसेच मंत्रीपदावरुन यांच्यात आगामी काळात वाद होतील, आणि याचा परिणाम लवकरच दिसेल अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.