मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
[read_also content=”डोंबिवलीत 48 लाखाचा गांजा जप्त, दोघांना पोलिसांनी केलं अटक https://www.navarashtra.com/crime/48-lakh-cannabis-seized-in-dombivali-299919.html”]
दरम्यान, शिंदे गटाचे गोव्याहून रवाना झालेले आमदार आता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंबरोबर (Eknath shinde) शिवसेनेचे 39 आमदार हे गोव्याला थांबले होते. काही वेळापूर्वी सर्व शिंदे बंडाळी गटातील आमदार गोवा विमानतळावर (Goa Airport) दाखल झाले होते, व गोव्याहून सर्व आमदार मुंबईसाठी रवाना झाले होते. (Shinde Group all MLA coming to Mumbai) उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड आहे. त्यामुळं प्रत्येक आमदाराला मतदान करावे लागणार आहे. त्यामुळं हे सर्व बंडाळी आमदार मुंबईसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन आमदारांसोबत प्रवास करत आहेत. बंड करून महाराष्ट्र सोडल्यानंतर ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. हे आमदार आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोव्यात आले होते. (Surat, Guhavati and Goa) आणि त्यानंतर ते आता मुंबईला आले आहेत. बंडखोर आमदारांना आधी गोव्यातील ताज हॉटेलमधून ट्रॅव्हल बसने विमानतळावर नेलं गेलं. तेथून हे आमदार विमानाने मुंबईला येतील. त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे.
आता शिंदे गटाचे गोव्याहून रवाना झालेले आमदार (Shinde Group MLA) आता मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाले आहेत. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात या आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आलं आहे. तसेच या बंडखोर आमदारांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनतर महाविकास आघाडी सरकारची आज संध्याकाळी बैठक होणार असून, विधानसभा अध्यक्ष निवडीवर बैठकीत होणार चर्चा होणार आहे. या सर्व आमदारांची ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.






