मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट (Shinde Vs Thackeray) अनेकवेळा आमनेसामने आला आहे. एकिकडे पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह या दोन्हीसाठी यांची न्यायालयीन (court) लढाई सुरु आहे. तर दुसरीकेड अधूनमधून हे दोन्ही गट कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन ऐकमेकांत भिडले जाताहेत. दरम्यान, शिंदे गटासाठी धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात झालेल्या राड्यावेळी स्वत:जवळ असणाऱ्या बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) चर्चेत आले होते. याप्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबई ते रायगड प्रवास करा फक्त २० मिनिटात, काय आहेत ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये? https://www.navarashtra.com/maharashtra/now-travel-from-mumbai-to-raigad-in-just-twenty-minutes-what-are-the-features-of-trans-harbor-link-project-361133.html”]
दरम्यान, बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ती गोळी सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधूनच निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बॅलेस्टिक अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार का? याची चौकशी होणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर प्रभादेवी परिसरात ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला होता. तर दुसरीकडे मुंबई पालिका निवडणुकाआधीच शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे, त्यामुळं शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण?
गणपती विसर्जनवेळी प्रभादेवी येथे सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. सदा सरवणकर यांनी पोलिसांसमोर आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यानंतर हा सगळा प्रकार घडला तेव्हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात रान उठवले होते. शिंदे-फडणवीस सरकार सरवणकर यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.