Solapur IT Park Dispute: आयटी पार्क शहरातच हवे -उद्योग मंत्री उदय सामंत दहा जुलै रोजी सोलापुरात घेणार अधिकाऱ्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर साठी आयटी पार्कची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहराजवळ होटगी रोडवरील जलसंपदा जागेवर आयटी पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
ही जागा जलसंपदा विभागाची असल्याने त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ती महसूल प्रशासनाकडे वर्ग केला जाणार आहे, त्यानंतर ते आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
दरम्यान शुक्रवारी 12 जून रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरच्या दौऱ्यावर आयटी पार्क शहरातच हवे, अशी भूमिका मांडल्याने पुन्हा एकदा होणार आयटी पार्क कुठे होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार असून, त्यासाठी सूमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्यशासनाच्या उच्चचस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यापूर्वी हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी दिले जाणार आहे.






