Top Marathi News Today Live : ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
Marathi Breaking News Updates : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी महाराष्ट्राबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी एक प्रखर देशभक्त आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून माझा कार्यकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव होता. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो’, असे नव्या उपराष्ट्रपतींनी सांगितले.
सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी ज्या-ज्या राज्यात राज्यपाल पद स्वीकारले, त्याची माहिती दिली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम करत होतो. तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. पण, माझा सर्वात आनंददायी कार्यकाळ महाराष्ट्रात होता. महाराष्ट्रातील माझ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात मला दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यवान होते.
जेव्हा मी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रात आलो, तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. नंतर त्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. दोघांमध्ये नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध होते.
12 Sep 2025 08:58 AM (IST)
आशिया कप 2025 च्या स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे, भारताच्या संघाने त्याच्या पहिला सामना हा यूएईविरुद्ध एकतर्फी जिंकला तर पहिला सामना अफगाणिस्तानच्या संघाने नावावर केला आहे. या स्पर्धेचा तिसरा सामना हा आज खेळवला जाणार आहे. हा सामना बांग्लादेश आणि हाॅंगकाॅंग या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. बांगलादेश गुरुवारी शेख झायेद स्टेडियमवर आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात हाँगकाँगविरुद्ध करेल, हाँगकाँगच्या संघाचा पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून वाईट पराभव झाला होता.
11 Sep 2025 07:19 PM (IST)
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा या महत्त्वाच्या बाजारपेठेत ग्रामीण रुग्णालयासाठी मंजुरी मिळाल्याची घोषणा झाल्याने ग्रामस्थांमध्ये एक आशेचा किरण दिसला होता. कारण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ मोखाडा तालुक्यातीलच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट, देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते पहिणा, तसेच इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यातीलही रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. जवळपास 24 महसुली गावे आणि 60 हून अधिक गावपाड्यांतील लोकांना या केंद्रावर अवलंबून राहावे लागते. या वाढत्या गर्दीसमोर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने 2016 पासूनच येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी होत होती. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि नेतेमंडळींनी वारंवार शासनाकडे प्रस्ताव सादर केला, पाठपुरावा केला. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचाच परिणाम म्हणून अखेर 2024 मध्ये घटस्थापनेच्या दिवशी 30 खाटांच्या श्रेणीवर्धन प्रस्तावाला लिखित मंजुरी मिळाली.
11 Sep 2025 07:09 PM (IST)
आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवरून हे स्पष्ट होते की लोक त्यांच्या मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचे वाढते प्रमाण खरोखरच चिंतेचा विषय आहे. गेल्या काही वर्षात आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढले आहे आणि समाजात हे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक आजाराने सध्या अनेक जण त्रस्त आहेत. मात्र त्यावर मात करण्याचे प्रमाण कमी आहे.
11 Sep 2025 06:54 PM (IST)
मुंबई: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावाही त्यांनी घेतला. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना अजित पवार कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता अजित पवार यांनी बैठक घेत योजनेच्या कामाचा आढावा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
11 Sep 2025 06:43 PM (IST)
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
11 Sep 2025 06:32 PM (IST)
Duleep Trophy Final South Zone vs Central Zone : बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य झोन आणि दक्षिण झोन आमनेसामने आहेत. या सामन्यात मध्ये झोनने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. मजबूत केली आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस, मध्य झोनने विकेट न गमावता ५० धावा केल्या आहेत. ते आता दक्षिण झोनपेक्षा फक्त ९९ धावांनी पिछाडीवर आहेत. त्याआधी मध्य झोनच्या कुमार कार्तिकेय आणि सरांश जैन या जोडीने दक्षिण झोनला १४९ धावांवरच गुंडाळले आहे.
11 Sep 2025 06:18 PM (IST)
Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारने जीआर काढत मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच हैदराबाद गॅझेटबाबत देखील जीआर काढला आहे. दरम्यान आता राज्य सरकारने काढलेल्या जीआर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
11 Sep 2025 06:00 PM (IST)
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
11 Sep 2025 05:53 PM (IST)
पंजाबमधील विनाशकारी पुरातून मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत आणि पूरग्रस्तांना मदत करत आहेत. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मीर फाउंडेशननेही आता मदतीचा हात पुढे केला आहे आणि पंजाबमधील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना मदत केली आहे. फाउंडेशनने पूरग्रस्त कुटुंबांना मदत साहित्य पुरवले आहे. तसेच अनेक बॉलीवूड कलाकार त्यांना मदत करताना दिसत आहेत.
11 Sep 2025 05:43 PM (IST)
अमेझॉनने गुरुवारी घोषणा केली की ते मुंबईतील काही निवडक भागात अमेझॉन नाऊची १० मिनिटांची डिलिव्हरी सेवा सुरू करत आहे. ही सेवा आधीच बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांच्या जवळ स्थापित केलेल्या सूक्ष्म-पूर्ती केंद्रांद्वारे ती काम करते. अमेझॉन नाऊ किराणा सामान, वैयक्तिक काळजी उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजची जलद उपलब्धता देते.
11 Sep 2025 05:26 PM (IST)
दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की कोणतीही वेबसाइट, यूट्यूब चॅनेल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय तिचे नाव, चित्र, आवाज किंवा कोणत्याही प्रकारची एआय-जनरेटेड सामग्री वापरू शकत नाही. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला आहे.
11 Sep 2025 05:15 PM (IST)
नवीन जीएसटी दरांमुळे Hyundai Motors ने त्यांच्या लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही, Hyundai Venue और Venue N Line च्या किमतीत मोठी कपात केली आहे. सब-4 मीटर एसयूव्हीवरील टॅक्स आता 29-31% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे, ज्याचा ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. या कपातीनंतर, व्हेन्यूच्या डिझेल व्हेरिएंटवर 1.32 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल.
11 Sep 2025 05:10 PM (IST)
नागरिकत्व न घेता मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याविरुद्ध चौकशी आणि खटला दाखल करण्याची मागणी करणारी याचिका राऊस अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत म्हटले आहे की सोनिया गांधी यांनी ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व मिळवले होते. तर १९८० च्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते.
11 Sep 2025 05:00 PM (IST)
तरुणांनी संसद भवनल, राष्ट्रपती भवन, सरकार कार्यलये, राजकीय कार्यालयांना पेटवून दिले. तसेच तरुणांना देखील अनेक मंत्र्यांना मारहाण केली, मंत्र्यांची घरे जाळली. यावेळी बिघडती परिस्थिती पाहता अनेक मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला. सध्या देशात अनेक भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नव्या सरकराच्या स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
11 Sep 2025 04:50 PM (IST)
स्कोडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नवी कार भारतात नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच होणार आहे. ही कार सीबीयू (CBU) स्वरूपात आणली जाणार असल्याने तिची विक्री मर्यादित संख्येत होण्याची शक्यता आहे.
11 Sep 2025 04:45 PM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुती सरकारकडून 2100 रुपये दरमहा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर आणि अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर देखील हे पैसे वाढवून देण्यात आलेले नाहीत. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेले आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीना २१०० रुपये देण्याबाबत वा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
11 Sep 2025 04:30 PM (IST)
मालवणच्या राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराठिकाणी पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत २२ जूनपासून पर्यटकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला होता. मागील दोन ते अडीच महिने चबुतराच्या सभोवती असलेल्या पदपथाची दुरुस्ती योग्य प्रकारे करण्यात आली असून आता पुन्हा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे.
11 Sep 2025 04:25 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला यांच्यासाठी पर्यावरण पुरक ई रिक्षा चालवल्या जातात.मात्र या रिक्षा चालण्यासाठी असलेले रस्ते हे दगड मातीचे असल्याने पर्यावरण पूरक ई रिक्षा या सतत नादुरुस्त होत आहेत.दरम्यान माथेरान शहरात असलेल्या 20 पर्यावरण पुरक ई रिक्षा पैकी सात ते आठ इ रिक्षा या नादुरुस्त असून त्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेज वाहनचालक यांना चार्जिंग स्टेशन येथेच बनवावे लागले आहेत.
11 Sep 2025 04:20 PM (IST)
पाळमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून या ठिकाणी भारतातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. त्यात मुरबाड मधील 112 पर्यटकांचा समावेश आहे. मुरबाड मधून दोन ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. नेपाळ मधली परिस्थिती गंभीर बनल्याने भारताच्या सीमारेषा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकून पडलेले आहेत. आपल्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे. तर या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका केली जाईल अशी माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
11 Sep 2025 04:15 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला यावर्षी ५५ नवीन बसेस देण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षातच आतापर्यंत ११० बसेस भंगारात काढण्यत आल्या आहेत. जानेवारीपर्यंत अजून २० बसेस भंगारात काढण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाला एसटी बसेसची कमतरता जाणवत असून अजून किमान ५० ते ६० नवीन बसेस मिळण्याची गरज आहे. तर दुसरीकडे सुमारे साडेचार कोटी खर्चून उभारलेले चार्जिंग सेंटर गाड्यांच्या प्रतीक्षेत असून तीन सीएनजी मंजूर असूनही अद्याप त्यांची कामे सुरू झाली नाहीत.
11 Sep 2025 04:05 PM (IST)
मालवण समुद्राच्या भरतीपूर्वी मासेमारी करून रापणसह होडी किनाच्यावर नांगरून ठेपलेली असताना अचानकपणे भरतीच्या पाण्यात होडी वाढून गेल्याने होडी नुकसानग्रस्त झाली आहे. ही होडी पूर्णपणे दुभंगली जाऊन त्यातील जाळीही समुद्रात वाहून गेली आहेत. यामध्ये अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
11 Sep 2025 04:01 PM (IST)
मीरा रोडच्या काशिमिरा परिसरामध्ये रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षाच्या मुलाला चिरडले.अपघातात त्या मुलाच्या कमरेखालच्या भागाला फार मोठी दुखापत झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.वाहतूक विभागाची चौकी घटनास्थळाच्या जवळ असतानाही अपघात घडून पूर्ण एक तास झाला तरी वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत, असा मनसेने आरोप केला आहे.
11 Sep 2025 03:25 PM (IST)
आधार कार्ड हा सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक सरकारी आणि खाजगी कामात ओळख पटवण्याचा सर्वात महत्वाचा कागदपत्र बनला आहे. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चुकीचे लिहिले असेल तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. नावातील एक छोटीशी चूक सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँक खाते उघडणे, पास्पोट मिळवणे, मुलांचे प्रवेश घेणे किंवा पॅन-आधार लिंक करणे यासारख्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अश्यापरिस्थित तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्यवस्थित करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडलं असेल की हे आपण घर बसल्या बसल्या कसे करू शकतो? तर यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.
11 Sep 2025 03:20 PM (IST)
“कोणत्याही ऑफरपासून दूर राहा” असा स्पष्ट आणि कठोर इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या नागरिकांना दिला आहे. रशियन सैन्यात भारतीय नागरिकांना फसवणुकीने भरती केल्याच्या बातम्या समोर आल्याने भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रातून धक्कादायक माहिती समोर आली. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात दोन भारतीय युवक आढळले, जे बांधकामाच्या कामासाठी रशियाला गेले होते, परंतु त्यांना थेट युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले. या खुलाशामुळे केवळ संबंधित कुटुंबांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
11 Sep 2025 03:13 PM (IST)
सप्टेंबर महिना म्हणजे सणांचा जल्लोष, गणपती बाप्पाच्या गजरात भरलेलं वातावरण आणि आनंदाच्या उधळणीचा काळ. या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या महिन्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि साऊथ ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट मराठीत अनुभवायला मिळणार आहेत. यामध्ये खास आकर्षण ठरणार आहे नुकताच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल ठरलेला आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा बेटर-हाफ ची लव्हस्टोरी.
11 Sep 2025 02:41 PM (IST)
Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धा सुरू झाली आहे. कालच भारताने संयुक्त अरब अमिरातीवर जोरदार विजय प्राप्त केला आहे. दरम्यान 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे.
11 Sep 2025 02:40 PM (IST)
Xiaomi लवकरच आणखी एक शक्तिशाली फोन लाँच करू शकते, जो कंपनी Xiaomi 16 म्हणून सादर करू शकते. फोनशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये आधीच ऑनलाइन समोर आली आहेत आणि हा आगामी फ्लॅगशिप डिव्हाइस Xiaomi 15 चा अपग्रेड केलेला मॉडेल असणार आहे, जो ऑक्टोबर 2024 मध्ये सादर करण्यात आला होता. अलीकडेच, Xiaomi 16 कधी लाँच केला जाईल याची माहितीदेखील समोर आली आहे.
11 Sep 2025 02:38 PM (IST)
गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी स्थिती सामान्य झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिल आहे ते, जाणून घेऊयात.
11 Sep 2025 02:36 PM (IST)
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तर देवी वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन येते. देवीच्या आगमनाच्या वेळी आणि प्रस्थानाच्या वेळी वाहन कोणते असेल आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घ्या. प्रत्येक वेळी देवीचे आगमन आणि प्रस्थान वेगवेगळे असते. यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवार, 22 सप्टेंबरपासून होत आहे. या वेळी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा नवरात्रीचा उत्सव 10 दिवस चालणार आहे. यंदा देवीचे आगमन हातावर होणार आहे.
11 Sep 2025 02:36 PM (IST)
११ सप्टेंबर २००१ ही तारीख ऐकताच आजही जगभरातील लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला, ज्याने इतिहास कायमचा बदलून टाकला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर विमाने आदळून झालेल्या त्या भयानक क्षणांना आज २४ वर्षे झाली, पण त्याची भीषण आठवण आजही जिवंत आहे.
11 Sep 2025 02:35 PM (IST)
सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी इडली, डोसा तर कधी कांदापोहे, उपमा, शिरा बनवला जातो. पण नेहमीच काही ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? सुचत नाही. साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ डाळीचे पीठ आंबवावे लागते. तांदळाचे पीठ व्यवस्थित आंबवल्याशिवाय इडली किंवा डोसा व्यवस्थित येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये नाचणीच्या पिठाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
11 Sep 2025 02:34 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता चांगलाच चर्चेत होता, दरम्यान ते प्रकरण शांत झालेलं असताना कपिल शर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता कपिल मनसेच्या निशाण्यात सापडला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
11 Sep 2025 01:50 PM (IST)
भारताच्या आशिया कपची सुरुवात दमदार केली आहे, टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात यूएईच्या संघाला पराभूत करुन सुपर 4 च्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता भारताचा संघ हा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे जेव्हापासून वेळापत्रक आले आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याचा विरोध केला आहे. आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा रद्द होणार का? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.
11 Sep 2025 01:40 PM (IST)
सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये ते गेले असताना तिथे पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंधळ घातला होता. परंतु यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर कुत्सित (गर्विष्ठ) हास्य दिसले. यामुळे सध्या त्यांच्या या हास्यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
11 Sep 2025 01:28 PM (IST)
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र गोंधळामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतावरही झाला आहे. सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून, महेंद्रनगर ते दिल्ली व डेहराडून या मार्गांवरील “मैत्री बस सेवा” तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत तर भारतात गेलेले अनेक नेपाळी नागरिकही घरी परतू शकत नाहीत.
11 Sep 2025 01:15 PM (IST)
नेपाळच्या राजकारणात सतत वाद निर्माण करणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जनरेशन-झेडच्या तीव्र विरोधानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही ओली यांनी आपली भारतविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. बुधवारी (१० सप्टेंबर २०२५) त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले.
11 Sep 2025 01:05 PM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. मोहन भागवत यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. भाजप नेत्यांकडून मोहन भागवत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी आरएसएस मोहन भागवत यांच्या कार्याचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधानांनी हा लेख शेअर केला आहे.
11 Sep 2025 12:55 PM (IST)
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धुळ्यावरून सोलापूर कडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.
11 Sep 2025 12:45 PM (IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे 'एक्स' अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने अर्थात एक्सने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने अकाउंट सस्पेंड झाल्याचे माहिती आहे.
11 Sep 2025 12:35 PM (IST)
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे गैरहजर आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पहिलाच दौरा असताना या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे अनुपस्थित असल्याने चर्चा सुरू झाली आहे. आमदार एकनाथ खडसे उपस्थित मात्र दुसरीकडे त्यांच्या कन्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे बैठकीला गैरहजर आहेत.
11 Sep 2025 12:20 PM (IST)
काल राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर आज मुंबईत मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर ही बैठक होत आहे.
11 Sep 2025 12:00 PM (IST)
मुंबईतील लालबागच्या राजा गणपतीला संपूर्ण देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भक्तीभावाने भाविक सोन्यापासून अनेक गोष्टी अर्पण करत असतात. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या गोष्टींचा आज लिलाव होणार आहे.
11 Sep 2025 11:50 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
11 Sep 2025 11:40 AM (IST)
नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
11 Sep 2025 11:30 AM (IST)
मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट सुरु करण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. पण त्याचवेळी जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद गॅझेटियरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या तरतुदीविरोधात लोकहितवादी याचिका दाखल करण्यात आली आहे.
11 Sep 2025 11:20 AM (IST)
भारतातील अनेक पर्यटक हे सध्या नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. काडमांडू विमानतळावर सध्या लष्कराचा ताबा आहे. नेपाळमधील परिस्थिती पूर्णपणे चिघळताना दिसली. अनेक मंत्र्यांनी देखील आपल्या पदाची राजीनामे दिली आहेत. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात असून अजूनही गोळीबार केला जात आहे.
11 Sep 2025 11:00 AM (IST)
असा एक भारतीय योगी याची ख्याती आणि चर्चा संपूर्ण विश्वामध्ये पसरली ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दमध्ये अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी अमेरिकेतील त्यांचे भाषण आहे. स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेसमोर ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे प्रसिद्ध भाषण दिले. ज्याची सुरुवात “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” या शब्दांनी झाली. या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी हिंदू धर्माचा सार्वत्रिक सहिष्णुतेचा संदेश जगासमोर मांडला आणि सर्व धर्मांच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे त्यांना आणि भारताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.
11 Sep 2025 10:53 AM (IST)
दरवर्षी सलमान खानच्या वादग्रस्त शो बिग बॉसमध्ये, एक अशी व्यक्ती येते जिच्यावर होस्ट आणि निर्मात्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप केला जातो. या सीझनमध्ये ती स्पर्धक कुनिका सदानंद आहे. गेल्या आठवड्यात नामांकन होऊनही आणि सर्वात कमी मते मिळवूनही जेव्हा कुनिकाला शोमधून बाहेर काढण्यात आले नाही, तेव्हा या शोचे प्रेक्षक संतापले. याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडीओ...
So now i understand why #SalmanKhan takes #KunickaaSadanand Side 😂❤️#BB19 #BiggBoss pic.twitter.com/dnjZ7zPYqC
— Rubiology 💋 (@ItsRubiology) September 9, 2025
11 Sep 2025 10:43 AM (IST)
भारतीय बाजारांसाठी आज संमिश्र संकेत दिसत आहेत. एफआयआयने फ्युचर्समध्ये दीर्घ व्यवहार वाढवले आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आशियामध्येही तेजीसह व्यवहार सुरू आहेत. काल अमेरिकन बाजारातही संमिश्र व्यवहार दिसून आले. डाउ जोन्स २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तथापि, एस अँड पी ५०० निर्देशांक आणि नॅस्डॅक हिरव्या चिन्हावर बंद होण्यास यशस्वी झाला. बातमी सविस्तर वाचा...
11 Sep 2025 10:30 AM (IST)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. अशातच एक सुंदर आणि सर्वांना सुखावून जाणारा एक व्हिडिओ सध्या इथे व्हायरल झाला आहे. घराच्या छतावर योगा करताना महिलेसोबत एक आश्चर्यकारक घटना घडून आली आणि याचाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. बातमी सविस्तर वाचा...






