पुणे – काही दिवसांपूर्वी भाजपा नेते व आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) वादग्रस्त वक्तव्य करताना, “पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासून काढून टाकावी लागेल”, अशी टिका भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आक्रमक होत, उत्तर दिलं होत. गुगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा…म्हणजे काय येते पाहा, असं ट्विट आमदार अमोल मिटकरींनी करत पडळकरांना जोरदार प्रतिउत्तर दिलं होतं. अशातच आता पुण्यातील एका माजी सैनिकाच्या मुलाने देखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर बॅनर लावले असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हटलं बॅनरवर…
सध्या माजी सैनिकाच्या मुलाने लावले हे बॅनर पुणेकरांचा चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर लिहिलं आहे की, पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. यावर पुढे लिहिलं आहे की, “माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही”. दरम्यान, या बॅनरवरून त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना एक सवाल देखील विचारण्यात आला आहे.
गुगलवर मंगळसूत्र सर्च…
दरम्यान, पडळकरांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. गुगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा…म्हणजे काय येते पाहा, असं ट्विट आमदार अमोल मिटकरींनी करत पडळकरांना प्रतिउत्तर देत मंगळसूत्र चोर असा टोला लगावला होता. त्यानंतर एक ट्विट करत हा” गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल…” असा घणाघाती हल्लाबोल मिटकरींना केला आहे.