Ashish Shelar directly targets Aditya Thackeray
मुंबई- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, तर आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी आणि कलगीतुरा यांचे राजकारण रंगत आहे. मागील एका वर्षापासून ‘जागर मुंबईचा’ ह्या उपक्रमातंर्गत भाजपाने (BJP) मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यातून ते मुंबईच्या विकास आराखड्याचे स्वरुप मांडताना, पालिकेत अनेक वर्ष सत्ताधारी असणाऱ्या ठाकरे गटावर सडकून टिका देखील करत आहेत, दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई पालिकेत घोटाळा झाल्याचा कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. यानंतर पालिकेतील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यानंतर आज भाजपा आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish shelar) यांनी काही ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं आहे.
◆ तीन वर्षांतील केवळ ५६ कामांमध्ये एवढा गोलमाल
◆ तर मग गेल्या १० वर्षांत केवढा मोठा घपला?
◆ काँग्रेसंने तर कोळसा खाल्ला, इथे तथाकथित वाघांचा तर तिजोरीवर डल्ला!
हे पहा मुंबईकर हो,
तुमचे हे कैवारी
कट, कमिशनसाठी कसायापेक्षा निर्दयी!
४/४— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 30, 2023
काय आहेत आशिष शेलारांचे ट्विट?
“तीन वर्षांतील केवळ ५६ कामांमध्ये एवढा गोलमाल, तर मग गेल्या १० वर्षांत केवढा मोठा घपला? काँग्रेसंने तर कोळसा खाल्ला, इथे तथाकथित वाघांचा तर तिजोरीवर डल्ला! हे पहा मुंबईकर हो, तुमचे हे कैवारी कट, कमिशनसाठी कसायापेक्षा निर्दयी!” असं शेलारांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तर “आता जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील कंपन्या मुंबईचे रस्ते तयार करीत आहेत, तेव्हा आदित्य ठाकरे चिडले? ….का? कंत्राटदारांचे रँकेट तोडले म्हणून? म्हणे.. मुंबईत एवढी कामे कशाला? सर्वे न करता कामे करण्यात येत आहेत. याच याच चोरांच्या उलट्या बोंबा CAG ने उघड्या पाडल्या!”, असं दुसऱ्या ट्विटमध्ये शेलारांनी म्हटलं आहे.
◆ CAG ने रस्त्यांच्या फक्त ५६ कामांचा अभ्यास केला यापैकी ५१ कामे कुठल्याही सर्वेक्षण न करता करण्यात आली
◆ ५४.५३ कोटीची कामे निविदा न मागवता देण्यात आली
◆ गंभीर बाब म्हणजे दोनच ठेकेदारांना ही १८ कामे देण्यात आली.
◆ संगणीकृत अहवालात हस्ताक्षरात नोंदी झाल्या
सब गोल”माल”!
२/४— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 30, 2023
सब गोल”माल”…
दरम्यान, तिसऱ्या ट्विटमध्ये शेलारांनी ठाकरे गटावर टिका करताना म्हटलं की, “CAG ने रस्त्यांच्या फक्त ५६ कामांचा अभ्यास केला यापैकी ५१ कामे कुठल्याही सर्वेक्षण न करता करण्यात आली. ५४.५३ कोटीची कामे निविदा न मागवता देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे दोनच ठेकेदारांना ही १८ कामे देण्यात आली. संगणीकृत अहवालात हस्ताक्षरात नोंदी झाल्या सब गोल”माल”, असं शेलारांनी म्हटलं. तर चौथ्या ट्विटमध्ये “२५ वर्षात मुंबई महापालिकेने रस्त्यांवर २१ हजार कोटी खर्च केले मग रस्ते खड्यात कसे गेले? रस्ते खड्यात, मग २१ हजार कोटी कुणाच्या खिशात? खिसेकापू कोण? दरोडेखोर कोण? लुटेरे कोण? मुंबईकर हो! तुमच्या प्रश्नांची उत्तरे CAG च्या अहवाल उघड. पालिकेचे कारभारी त्यांचीच ही वाटमारी!” असा ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलारांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. याला आता आदित्य ठाकरे कसे प्रतिउत्तर देतात हे पाहवे लागेल.