युट्यूबर ध्रुव राठी हा नेहमीच्या त्याच्या अनेक वादग्रस्त आणि माहितीपूर्ण व्हिडीओमुळे चर्चेत असतो. सध्या ध्रुव राठी (Dhruv Rathee) हा सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच ध्रुव राठीने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. काही जण या व्हिडीओचं कौतुक करत आहेत तर काहींनी या व्हिडीओमुळे ध्रुवला ट्रोल सुद्धा केलं आहे.
त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे नेहमीच त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतात. नुकतीच किरण माने यांनी ध्रुवच्या व्हिडीओबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी ध्रुवचं कौतुक केलं आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “ध्रुव राठी ! इस व्हिडीओने आग लगा दी भाई. संविधानावर आणि आपल्या देशावर प्रेम असणार्या प्रत्येकानं बघा. बघाच. पुन्हा पुन्हा बघा. शेअर करा.”
किरण माने यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “शंभर न्यूज चॅनल्स, दोन वर्ष करू शकणार नाहीत एवढा जबरी प्रभाव ध्रुव राठीच्या एका व्हिडीओनं साधलाय. जगभर व्हायरल होतोय. भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतेय. मराठीमध्ये कुणी करतंय का?”
जाणून घ्या ध्रुव राठीबद्दल
ध्रुव हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला 14.9 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. ध्रुव हा विविध विषयांवर आधारित व्हिडीओ युट्यूबवर शेअर करतो. ध्रुव हा अनेक वादग्रस्त विषयांवर सुद्धा व्हिडीओ बनवत असतो. त्याचबरोबर तो ब्लॉगिंग चॅनेल सुद्धा चालवतो. त्यामध्ये तो त्याच्या खासगी जीवनाबद्दल आणि तो ज्या ठिकाणी जातो तेथील माहिती तो प्रेक्षकांना देतो. दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ध्रुवनं मोदी सरकारवर कडकडून टीका केली आहे. सध्या ध्रुव हा त्याच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.