Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : प्रचारतोफा थंडावल्या तरीही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देता येणार

Marathi Breaking Live Updates : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 14, 2026 | 06:53 PM
Top Marathi News Today Live : महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते; शशिकांत शिंदेंचं विधान

Top Marathi News Today Live : महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते; शशिकांत शिंदेंचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवाराला ‘डोअर टू डोअर’ म्हणजेच घरोघरी प्रचार करण्याची मुभा असणार आहे. उमेदवार पाच पेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीसाठी जाहीरसभा, प्रचार रॅली निघणार नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवर प्रचार करता येणार आहे. याची माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली. ते म्हणाले, अर्थातच हा नियम मी नव्याने तयार केलेला नाही. तो आधीपासूनच अस्तित्वात होता. यासाठी त्यांनी २०१२ सालच्या निवडणूक आयोगाचा दाखलाही दिला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबत असतो. मात्र, यावेळी उमेदवाराला या ४८ तासाच्या कालावधीत घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करण्याची मुभा असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

The liveblog has ended.
  • 14 Jan 2026 06:48 PM (IST)

    14 Jan 2026 06:48 PM (IST)

    प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन!

    प्री-मॅट्रिक (इयत्ता ९ वी व १० वी) तसेच पोस्ट-मॅट्रिक (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याकडून करण्यात आले आहे. सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले असून, एनएसपी (National Scholarship Portal) वर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.

  • 14 Jan 2026 06:23 PM (IST)

    14 Jan 2026 06:23 PM (IST)

    PMC Election मध्ये पीएमपी व्यस्त? प्रवाशांना मोठा फटका; १,७५० पैकी 'इतक्या' बस आरक्षित

    पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १४ आणि १५ जानेवारी रोजी पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) बस सेवेत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने पीएमपीच्या ताफ्यातील तब्बल १,०५६ बस आरक्षित केल्याने त्याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.

  • 14 Jan 2026 06:04 PM (IST)

    14 Jan 2026 06:04 PM (IST)

    डाक विभागाच्या डिजिटल व्यवहारांना ग्राहकांची वाढती पसंती; पुणे क्षेत्रात महसुलात लक्षणीय वाढ

    पुणे: डाक विभागाच्या विविध सेवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल पेमेंट सुविधांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. डायनॅमिक क्यूआर कोडद्वारे फोन पे, गुगल पे यांसारख्या यूपीआय अ‍ॅप्स तसेच एसबीआय पीओएस मशीनच्या माध्यमातून होणाऱ्य  डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा कल रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांकडे वाढत असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राचे संचालक अभिजीत बनसोडे यांनी दिली.

  • 14 Jan 2026 05:55 PM (IST)

    14 Jan 2026 05:55 PM (IST)

    वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश

    फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षांदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या आदेशासाठी कोणताही आर्थिक निधी उपलब्ध करून न देता संपूर्ण आर्थिक भार शाळा व संस्थांवर टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केला आहे. त्यामुळे “सीसीटीव्हीसाठी निधी द्या, अन्यथा आमच्या शाळांमधील परीक्षा केंद्र रद्द करा” असा ठाम पवित्रा महामंडळाने घेतला असून, याबाबतचे निवेदन थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे.

  • 14 Jan 2026 05:29 PM (IST)

    14 Jan 2026 05:29 PM (IST)

    मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी!

     मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. उद्या, गुरुवारी (१५ जानेवारी) होणाऱ्या मतदानापूर्वी आज मुंबईत एक विशेष आध्यात्मिक आणि राजकीय चित्र पाहायला मिळाले. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या कुटुंबासह मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवीचे दर्शन घेतले. निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी देवीला साकडे घातले.

  • 14 Jan 2026 05:09 PM (IST)

    14 Jan 2026 05:09 PM (IST)

    एसबीआयने नॉन-ATM शुल्क वाढवले

    देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एटीएममधून पैसे काढणे आता पूर्वीपेक्षा महाग होऊ शकते. बँकेने इतर बँकांच्या एटीएम वापरण्यासाठी शुल्क वाढवले ​​आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अशा ग्राहकांच्या खिशावर होईल जे वारंवार नॉन-एसबीआय एटीएम वापरतात.

  • 14 Jan 2026 04:00 PM (IST)

    14 Jan 2026 04:00 PM (IST)

    Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच!

    NoiseFit Pro 6R भारतात लाँच करण्यात आले आहे. Noise ने लाँच केलेले नवीन स्मार्टवॉच अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीचे हे नवीन डिव्हाईस लेदर स्ट्रॅप, सिलिकॉन स्ट्रॅप आणि मेटल स्ट्रॅप व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक व्हेरिअंटमध्ये एक वेगळा कलर ऑप्शन देण्यात आला आहे. नवीन NoiseFit Pro 6R मध्ये 42mm चा राउंड डायल आहे, ज्यामध्ये 1.46-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही स्मार्टफोनसोबत कम्पॅटिबल आहे. टेक कंपनीने असा दावा केला आहे की, NoiseFit Pro 6R तब्बल 7 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते.

    वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 03:50 PM (IST)

    14 Jan 2026 03:50 PM (IST)

    Iran Protests 2026: ‘माझ्यावर एक उपकार करा, थोडी लाज बाळगा’ जर्मनी- इराणमध्ये शब्दयुद्ध तीव्र

    Iran Germany diplomatic row 2026 : इराणमधील (Iran) अंतर्गत असंतोषाने आता जागतिक राजनैतिक संघर्षाचे रूप घेतले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशावर जर्मनीचे (Germany) चान्सलर फ्रेडरिक मर्झ (Friedrich Merz) यांनी केलेल्या एका विधानाने तेहरानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मर्झ यांनी म्हटले होते की, “अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे.” यावर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देत जर्मनीला “लाज बाळगण्याचा” सल्ला दिला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 03:35 PM (IST)

    14 Jan 2026 03:35 PM (IST)

    नागपुरात ‘दंत’चे निवासी डॉक्टर तीन महिन्यांपासून बिनपगारी

    नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संयम अखेर सोमवारी तुटला. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने नाराज झालेल्या ७२ पदव्युत्तर निवासी डॉक्टरांनी सोमवारी (दि.१२) कामबंद आंदोलन पुकारले. या संपाचा थेट परिणाम ओपीडी आणि आयपीडी सेवांवर झाला. दंत महाविद्यालयात सध्या ७२ पदव्युत्तर दरमहा ७० हजार इतके विद्यार्थी वेतन मिळते. या रकमेतून मेस शुल्क, पुस्तके, स्टेशनरी यांसह दैनंदिन खर्च भागवावा लागतो. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून वेतन न मिळाल्याने डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. डॉक्टरांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.

    वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 03:25 PM (IST)

    14 Jan 2026 03:25 PM (IST)

    DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती!

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), बेंगळुरू येथे तरुण आणि पात्र संशोधकांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी एकूण 10 पदे भरली जाणार असून, यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 25 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होता येणार आहे.

    वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 03:14 PM (IST)

    14 Jan 2026 03:14 PM (IST)

    मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात नेसा ‘या’ पारंपरिक साड्या

    नवीन वर्षात पहिला मकर संक्रांत आला आहे. या सणाची कमालीची उत्सुकता पाहिला मिळते. मात्र, पहिली संक्रांत असो किंवा दुसरी महिलांना सण म्हटला की, साड्या खरेदी करतातच यात शंकाच नाही. मकर संक्रांतीच्या सणाला नेसण्यासाठी या साडचा अगदी परफेक्ट आहेत. या साड्या नेसल्यावर तुमचे रूप अधिकच खुलेल. या साड्या अतिशय आरामदायक आहेत आणि नेण्यासही सोप्या आहेत.(फोटो सौजन्य – pinterest)

    वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 02:55 PM (IST)

    14 Jan 2026 02:55 PM (IST)

    ‘अगं अगं सूनबाई..' केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

    मराठी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक आपली वेगळी ओळख निर्माण करतात. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्त्रीमन समजून, त्यातील सूक्ष्म भावना, संघर्ष आणि सामर्थ्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात केदार शिंदे यांचा हातखंडा आहे. ‘अगं बाई.. अरेच्चा!’पासून ‘बाईपण भारी देवा’पर्यंत त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने स्त्रीकेंद्री कथांना नवा आत्मा दिला आहे. स्त्रीमन समजून घेणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता मराठी प्रेक्षकांसाठी ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ च्या माध्यमतून एक वेगळी कथा घेऊन येत आहेत.

  • 14 Jan 2026 02:50 PM (IST)

    14 Jan 2026 02:50 PM (IST)

    दुबार मतदार सापडला तर त्याला तिथेच ठोका…!

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. आचारसंहिता लागू झाली असून उद्या दि.15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. सध्या (BMC Elections 2026) आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र निवडणूक आय़ोगाने (Election Commission) घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • 14 Jan 2026 02:45 PM (IST)

    14 Jan 2026 02:45 PM (IST)

    मासिक पाळीतील वेदना ठरल्या जीवघेण्या; 19 वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

    कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामागचं कारण म्हणजे मासिक पाळीत होणार त्रास. ही घटना कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव कीर्तन असे आहे.

  • 14 Jan 2026 02:40 PM (IST)

    14 Jan 2026 02:40 PM (IST)

    29 ते 31 जानेवारीदरम्यान ‘हे’ ग्रह एकामागून एक बदलणार आपले नक्षत्र

    ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे एकामागोमाग नक्षत्रातील बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यांचा व्यक्तीवर सतत आणि तीव्र प्रभाव पडतो. ग्रहाची ऊर्जा व्यक्तीवर सतत सक्रिय राहते, ज्याचा त्याच्या जीवनातील प्रत्येक कामावर आणि क्षेत्रावर खोलवर परिणाम होतो. जानेवारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये चार ग्रह दुर्मिळ युती करत आहे. पंचांगानुसार, मंगळ, गुरू, बुध आणि शुक्र हे चार ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • 14 Jan 2026 02:32 PM (IST)

    14 Jan 2026 02:32 PM (IST)

    न्यूझीलंडचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार प्रथम फलंदाजी

    IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना बडोदरा येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • 14 Jan 2026 02:17 PM (IST)

    14 Jan 2026 02:17 PM (IST)

    किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी

    काही महिन्यांपूर्वी आयफोन 17 सिरीज लाँच करण्यात आली होती. यानंतर सर्वच लोकांमध्ये आयफोन 17 ची क्रेझ सुरु झाली. आयफोन 17 खरेदी करावा, असं अनेकांना वाटत होतं. मात्र किंमत जास्त असल्यामुळे अनेकांनी आयफोन 17 खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलला. मात्र आता तुमची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही अत्यंत कमी किंमतीत आयफोन 17 खरेदी करू शकणार आहात. कारण फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल 2026 लवकरच सुरु होणार आहे. हा सेल 16 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • 14 Jan 2026 02:00 PM (IST)

    14 Jan 2026 02:00 PM (IST)

    ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन?

    जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी मालिकेपैकी एक असलेल्या "स्ट्रेंजर थिंग्ज" चा शेवटचा भाग ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्याने व्ह्यूजचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला असताना, जगभरातील चाहत्यांच्या उत्साहात नेटफ्लिक्स देखील क्रॅश झाला असे म्हटले जाते. २९ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान जगभरात त्याला ३१.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले, तर त्याच काळात अंतिम सीझनला एकूण १०५.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. मनोरंजक म्हणजे, आता याच शेवटच्या भागाबद्दल, एपिसोड ८ बद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे मालिकेवरील एका डॉक्युमेंटरीमुळे आहे. मॅट डफर आणि रॉस डफर यांनी शेवटच्या एपिसोडसाठी कथा लिहिण्यासाठी एआय टूल चॅटजीपीटी वापरला का याबद्दल इंटरनेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • 14 Jan 2026 01:58 PM (IST)

    14 Jan 2026 01:58 PM (IST)

    भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती

     भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना परदेशात चांगली पसंती मिळू लागली आहे. २०२५ पर्यंत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्वे मोबाईल फोन सारख्या उत्पादनात सरकारी धोरणांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे झाल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. स्मार्टफोन निर्यात प्रमाण अलीकडे भारतात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक ४ फोनपैकी १ फोन निर्यात केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस केवळ मोबाईल फोन निर्यात २.७ लाख कोटीपर्यंत पोहोचू शकते.

  • 14 Jan 2026 01:50 PM (IST)

    14 Jan 2026 01:50 PM (IST)

    बॉक्स ऑफिसवर आश्चर्य! ११ दिवसांत बजेटच्या पाचपट कमाई करणारा ‘हा’ चित्रपट चर्चेत

    आजकाल, बॉक्स ऑफिसवर मोठ्या नावाच्या चित्रपटांचे आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. जोरदार प्रमोशन, संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि शेकडो कोटी कमाईची अपेक्षा यामुळे हे चित्रपट चर्चेत राहतात. अशा परिस्थितीत, असे गृहीत धरले जाते की लहान आणि कमी बजेटच्या चित्रपटांना थिएटरमध्ये टिकणे कठीण जाते. अलीकडेच, बॉक्स ऑफिसवर काहीतरी अनपेक्षित घडले. अतिशय मर्यादित प्रसिद्धीसह प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने शांतपणे प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आणि हळूहळू नफ्याच्या बाबतीत मोठ्या बजेटच्या चित्रपटांना मागे टाकले.

  • 14 Jan 2026 01:45 PM (IST)

    14 Jan 2026 01:45 PM (IST)

    आयटम साँगसाठी होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने दिले रोखठोक उत्तर

    मलायका अरोरा बॉलीवूडमध्ये तिच्या आयटम नंबरसाठी ओळखली जाते. शाहरुख खानसोबतचा “चल छैय्या छैय्या” असो किंवा सलमान खानसोबतचा “मुन्नी बदनाम हुई” असो, तिचा डान्स चाहत्यांना खूप आवडतो. परंतु, तिला अनेकदा त्यासाठी टीकेला सामोरे जावे लागले आहे. आता, तिने एका मुलाखतीत याबद्दल आपले ठाम मत मांडले आहे. आयटम सॉंग्स केल्याने तिला सशक्त वाटते. तिने त्याबद्दल माफी का मागावी? असा प्रश्न तिने नेटकऱ्यांना केला आहे.

  • 14 Jan 2026 01:35 PM (IST)

    14 Jan 2026 01:35 PM (IST)

    निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल का…? फडणवीसांचे रोखठोक उत्तर

    मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिका निवडणुकांचा प्रचार संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नवभारत’शी निवडणूक प्रचारादरम्यान येणाऱ्या आव्हानांबद्दल, संभाव्य निकालांबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. माजी पोलिस महासंचालक डीजीपी रश्मी शुक्ला यांनी एक अहवाल सादर केला आहे ज्यामध्ये तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी तुम्हाला आणि एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. काही कारवाई केली जाणार का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले.

  • 14 Jan 2026 01:28 PM (IST)

    14 Jan 2026 01:28 PM (IST)

    इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी

    इराणमध्ये (Iran) सुरु असलेल्या आंदोलन अधिक उग्र झाले आहे. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये हे आंदोलन सुरु असून आटोतक्यात येण्याचे नाव घेईना. आतापर्यंत या आंदोलनात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. खामेनेई सरकारने दिलेल्या आदेशानंतर सुरक्षा दलांनी कडक कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले आहे. याच वेळी एका २६ वर्षीय आंदोलकांन करणाऱ्या तरुणाला आज फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. इरफान सोलतानी असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर मोहारेबेह म्हणजेच अल्लाहविरुद्द युद्ध पुकारल्याचा आरोप आहे.

  • 14 Jan 2026 01:20 PM (IST)

    14 Jan 2026 01:20 PM (IST)

    इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

    इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जनआक्रोशाने आता अशा थराचा हिंसक वळण घेतले आहे, ज्याची कल्पनाही करवत नाही. ‘इराण इंटरनॅशनल’ (Iran International) या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या खळबळजनक अहवालानुसार, ८ आणि ९ जानेवारीच्या रात्री इराणमध्ये आधुनिक इतिहासातील सर्वात मोठे हत्याकांड घडले आहे. सरकारी आणि सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने या अहवा

  • 14 Jan 2026 01:15 PM (IST)

    14 Jan 2026 01:15 PM (IST)

    IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार प्रथम फलंदाजी

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

  • 14 Jan 2026 01:10 PM (IST)

    14 Jan 2026 01:10 PM (IST)

    इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

    इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी “मदत पोहोचवली जाईल” असे म्हणत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या या ‘वार प्लॅन’ला अमेरिकेच्याच जवळच्या मित्रांकडून कडवा विरोध होताना दिसत आहे. सौदी अरेबिया, कतार आणि ओमान या तीन महत्त्वाच्या आखाती राष्ट्रांनी इराणच्या बाजूने ‘बॅकडोअर’ मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या देशांच्या मते, इराणवर केलेला कोणताही हल्ला हा अमेरिकेसाठी ‘बूमरँग’ ठरू शकतो.

  • 14 Jan 2026 12:50 PM (IST)

    14 Jan 2026 12:50 PM (IST)

    गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

    मोबाईल गेमिंगमध्ये एक मोठा बदल होणार आहे. लोकप्रिय Royal Enfield चा अनुभव आता BGMI मध्ये देखील मिळणार आहे. कंपन्यांच्या या पार्टनरशिपमुळे गेमिंगचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे.

  • 14 Jan 2026 12:40 PM (IST)

    14 Jan 2026 12:40 PM (IST)

    ‘बिग बॉस मराठी ६’: पॉवर कीचा मोह रुचिताला पडणार भारी? तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल!

    'बिग बॉस मराठी सीझन ६' नुकताच सुरू झाला आहे. या सीझनची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि अखेर हा शो सुरु झाला आहे. आणि 'बिग बॉस'च्या घरात राडा देखील सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 14 Jan 2026 12:30 PM (IST)

    14 Jan 2026 12:30 PM (IST)

    वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार, आता…

    शिवाजीनगर येथील हवामान वेधशाळा कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असून, येथे मोकळी जागा व हिरवाईचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम कमी असल्यामुळे रात्री मोकळ्या जमिनीतून उष्णता वेगाने आकाशात निघून जाते.

  • 14 Jan 2026 12:20 PM (IST)

    14 Jan 2026 12:20 PM (IST)

    फोर्ड प्लांटमध्ये ट्रम्पला राग अनावर; ‘पीडोफाईल प्रोटेक्टर ‘ म्हणणाऱ्या माणसाकडे पाहून केले आक्षेपार्ह हावभाव

    मिशिगनमधील फोर्ड प्लांटमध्ये, ट्रम्प यांनी एका माणसाकडे आक्षेपार्ह हावभाव केला ज्याने त्यांना 'पीडोफाईल प्रोटेक्टर' म्हटले. जेफ्री एपस्टाईन घोटाळ्याच्या दरम्यान, ट्रम्पचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

  • 14 Jan 2026 12:14 PM (IST)

    14 Jan 2026 12:14 PM (IST)

    राजकोटमध्ये कोण करणार ‘राज’? आयुष बडोनीच्या जागी ‘या’ खेळाडूची सरप्राईज एंट्री

    पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या वॉशिंग्टन सुंदरला या सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी टीम इंडियाने २६ वर्षीय आयुष बदोनीचा समावेश केला आहे, जो पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघाचा भाग आहे. बदोनीने स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 14 Jan 2026 12:05 PM (IST)

    14 Jan 2026 12:05 PM (IST)

    सावरकरांचे फोटो संसदेतून हटवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा नकार

    संसद आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहून विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो हटवण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. याचिका दाखल करणाऱ्या माजी अधिकाऱ्याला याचिका मागे घेण्याची परवानगी देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठ्या दंडाचा इशारा दिला. अशा याचिकेत तथ्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

  • 14 Jan 2026 11:55 AM (IST)

    14 Jan 2026 11:55 AM (IST)

    गॅस रिफिलिंग सेंटरला भीषण आग

    हैदराबादच्या कुकटपल्ली पोलिस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर येथील एका गॅस रिफिलिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली आणि त्यात अनेक स्फोट झाले. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रिफिलिंग युनिटमध्ये भीषण आग लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिफिलिंग दरम्यान गॅस गळतीमुळे आग लागली आणि लवकरच ती मोठ्या आगीत रूपांतरित झाली.

  • 14 Jan 2026 11:45 AM (IST)

    14 Jan 2026 11:45 AM (IST)

    निवडणुकीत जिंकण्यासाठी बनला राक्षस; गावातील 500 कुत्र्यांना केले ठार

    ग्रामपंचायत निवडणुकीनंतर, तेलंगणातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात, विविध जिल्ह्यांतील गावांमध्ये सुमारे ५०० कुत्र्यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे. या घटनांमध्ये पंचायत प्रतिनिधींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. अलिकडच्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी ग्रामस्थांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिल्याचे गावातील सूत्रांनी सांगितले.

  • 14 Jan 2026 11:35 AM (IST)

    14 Jan 2026 11:35 AM (IST)

    मकर संक्रांतीमुळे दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

    नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांतीचा मोठा उत्साह संपूर्ण राज्यामध्ये आहे. तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उफाळली आहे. अनेकांनी बाप्पाच्या दर्शनाने सण साजरा केला आहे.

  • 14 Jan 2026 11:25 AM (IST)

    14 Jan 2026 11:25 AM (IST)

    नेते रविशंकर प्रसाद यांच्या घराला आग, अग्निशमन दलाचे वाहन दाखल

    भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील घराला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे अधिकृत निवासस्थान दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील २१ मदर तेरेसा क्रेसेंट रोड येथे आहे. बुधवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास ही आग लागली.

  • 14 Jan 2026 11:15 AM (IST)

    14 Jan 2026 11:15 AM (IST)

    पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून घरोघरी - खासदार राऊत

    “प्रचार संपलेला आहे काल. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करु शकता. तो ही घराघरात जाऊन. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची पंरपरा होती. अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली. प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करु शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरु आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 14 Jan 2026 11:05 AM (IST)

    14 Jan 2026 11:05 AM (IST)

    पानिपत लढाईच्या स्मरणार्थ मराठा शोर्य दिन साजरा

    पानिपतची लढाई केवळ एका पराभवाची नव्हे तर देशभक्तीच्या उच्च आदर्शांची शिकवण देणारी घटना आहे. मराठा योद्ध्यांचे धैर्य, रणनीती, आणि बलिदान इतिहासात अमर आहे. आजच्या दिवशी पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा साम्राज्याच्या पराक्रमाला आणि त्यागाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. 14 जानेवारी 1761 रोजी घडलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या लढाईत मराठा साम्राज्याने अफगाण शासक अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढा दिला. जरी या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या शौर्य, त्याग, आणि देशभक्तीची कथा आजही प्रेरणादायी आहे.

  • 14 Jan 2026 11:00 AM (IST)

    14 Jan 2026 11:00 AM (IST)

    कुसेगाव ग्रामपंचायत बरखास्त

    दौंड तालुक्यातील कुसेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांवर निलंबित करण्याची कारवाई पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली आहे. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कुसेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व बाजार व्यावसायिक गाळे इमारत बांधकाम करताना कोणत्याही शासकीय नियमांचे पालन केले नाही. सरकारी निधीचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवून सन २०२१ ते २०२६ पर्यंतच्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच व ७ सदस्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

  • 14 Jan 2026 10:50 AM (IST)

    14 Jan 2026 10:50 AM (IST)

    बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच

    Samsung Galaxy A07 5G स्मार्टफोन थायलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Samsung च्या A-सीरीज लाइनअपमध्ये जोडण्यात आलेला एक नवीन 5G ऑप्शन आहे. हा फोन सॅमसंगच्या रीजनल वेबसाईटवर किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने गेल्यावर्षी Galaxy A07 4G स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. यामध्ये दिर्घकाळ चालणारी बॅटरी आहे. Galaxy A07 चा 4G व्हेरिअंट ऑक्टोबर 2025 मध्ये Galaxy F07 4G आणि Galaxy M07 4G सह भारतात लाँच करण्यात आला होता.

  • 14 Jan 2026 10:40 AM (IST)

    14 Jan 2026 10:40 AM (IST)

    45 सेकंदाच्या आजोबांच्या व्हिडिओने सर्वांनाच लाजवल

    आजच्या धावपळीच्या जगात लोक कामाला अधिक प्राधान्य देतात पण यात फिटनेस कुठेतरी दूर राहून जातो. शरीर सदृढ ठेवायचं असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि व्यायाम करणं फार गरजेचं ठरतं. काही लोक कामाअभावी फिटनेस करणं टाळतात तर काही आपल्या आळशीपणामुळे यापासून दूर पळतात. अशात अलिकडेच एका आजोबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यात ते आपला फिटनेस दाखवत अनोखे करतब करताना दिसून आले. वय वाढत असतानाही एक वृद्ध व्यक्ती इतका फिट आहे ही गोष्ट अनेक तरुणांना लाजवणारी आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती ज्या चपळतेने आणि उत्साहाने फिटनेस मूव्हज करताना दिसत आहेत ते पाहून सिद्ध होते की वय तर फक्त एक नंबर आहे आपल्या मनात जिद्ध असेल तर आपण काहीही करु शकतो.

  • 14 Jan 2026 10:30 AM (IST)

    14 Jan 2026 10:30 AM (IST)

    Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट

    वॉशिंग्टन : नुकतेच अमेरिकेने ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर (Venezuela) तीव्र हल्ला केला होता. यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवल्याचा आणि अमेरिकेत ड्रग्जचे जाळे पसरवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला व्हेनेझुएलाच्या सांगण्यावरुनच केला असल्याचे म्हटले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • 14 Jan 2026 10:24 AM (IST)

    14 Jan 2026 10:24 AM (IST)

    काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, मकर संक्रांत साजरा

    भारतातील सण-उत्सवांमध्ये मकर संक्रांतीला (Makar Sankranti) अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२६ मध्ये, मकर संक्रांतीचा मुख्य मुहूर्त बुधवार, १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी आहे. इंग्रजी तारखेनुसार येणारा हा एकमेव हिंदू सण भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या नावांनी आणि संस्कृतींनी ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया, या एकाच सणाचे देशाच्या विविध भागांत बदलणारे रंग. वाचा सविस्तर 

  • 14 Jan 2026 10:00 AM (IST)

    14 Jan 2026 10:00 AM (IST)

    बीडमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

    सुंदर निवृत्ती तायड (वय ३४, रा. रामपुरी ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध गुन्ह्याचे दोषारोप पत्र सत्र न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आलेले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातील सर्व साक्षीदार तसेच तपास कामी गोळा केलेले सर्व पुरावे यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुंदर निवृत्ती तायड याला बीड येथील सत्र न्यायालयाने २० वर्ष कारवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

  • 14 Jan 2026 09:55 AM (IST)

    14 Jan 2026 09:55 AM (IST)

    सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुचाकीच पेटवली

    मध्यरात्री सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने दुसऱ्या दिवशी मध्यरात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी पेटवून दिली. या आगीमुळे दुकानाचा बोर्ड आणि दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना १२ जानेवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात घडली.

  • 14 Jan 2026 09:50 AM (IST)

    14 Jan 2026 09:50 AM (IST)

    'मशिद आणि अजानच्या नावावर…'; मतदानाआधी नितेश राणेंचे मोठे विधान

    राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान होणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत संपली आहे. दरम्यान आज ठाण्यात मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीसंदर्भात एक भाष्य केले आहे.त्या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

  • 14 Jan 2026 09:45 AM (IST)

    14 Jan 2026 09:45 AM (IST)

    गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

    संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे पतीसह राहणाऱ्या २७ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

  • 14 Jan 2026 09:41 AM (IST)

    14 Jan 2026 09:41 AM (IST)

    सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याचे संकेत, बाजार उघडताच गुंतवणूकदारांना बसणार धक्का

    भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली. याचा परिणाम आज बुधवारी देखील पाहायला मिळणार आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७३८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५३ अंकांनी कमी होता.

Web Title: Marathi top news marathi breaking live updates international news national news crime news live updates 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • international news
  • live updates
  • Marathi Breaking
  • national news
  • Navarashtra Live Marathi

संबंधित बातम्या

इस्त्रायल-इराण हल्ल्याचा विमानसेवेवर मोठा परिणाम; तब्बल 3000 विमानांची उड्डाणे केली गेली रद्द
1

इस्त्रायल-इराण हल्ल्याचा विमानसेवेवर मोठा परिणाम; तब्बल 3000 विमानांची उड्डाणे केली गेली रद्द

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
2

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात
3

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’
4

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.