Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो,” असा खळबळजनक आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेतील पेपरलीकची काही प्रकरणे २०२६ मध्ये उघडकीस आली. यात NEET, TET,SRPF या परीक्षांचे पेपर लीक झाले. त्यानंतर आता एफडीए मधील औषध निरीक्षक परीक्षेचाही पेपर लीक झाल्याचा प्रकार समोर आले आहे. पेपरफुटीतून अधिकारी होणार असतील तर काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या औषधांनी जसा २२ मुलांचा मृत्यू झाला होता तशा घटना भविष्यात अशा अधिकाऱ्यामुळे घडू शकतात.” असा दावाही रोहित पवारांनी यावेळी केला.
रोहित पवार म्हणाले, हे प्रकरण कसं समोर आलं. तर नंदुरबारमधील कौटिल्य अॅकॅडमी क्लामधून हा पेपर लीक केला गेला. MPSCचा पेपर फुटला असं नाही पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटलान य ज्याने हा पेपर फोडला, त्या व्यक्तीने ज्यांना पेपर दिले त्यांना तो व्हाट्सअपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा आणि पाच मिनिटाच डिलीट करायचा. त्यातल्या एकाना त्याच्या मित्राला प्रश्नपत्रिका पाठवल्याने हेप्रकरण उघडकीस आले.
रोहित पवार म्हणाले, “एका नायब तहसीलदारांच्या मुलाला 13 वा आणि मुलीला 16 वा क्रमांक मिळाला आहे. हा केवळ योगायोग आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात बार्शी कनेक्शन असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून विद्यार्थ्यांनी 21 जुलै रोजी एमपीएससीकडे तक्रार केली होती. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. उलट तक्रार करणाऱ्यांनाच पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जात आहे.”
एमपीएससी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करत रोहित पवार केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे, असही रोहित पवार यांनी नमुद केलं.
तलाठी भरती प्रक्रियेचाही उल्लेख करत रोहित पवार म्हणाले, “तलाठी भरतीतील कथित गैरप्रकारांचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर विद्यार्थ्यांना न्यायासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) जावे लागले. न्यायाधिकरणाच्या निकालात तलाठी भरती प्रक्रियेत 62 गैरप्रकार समोर आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.”
टीईटी पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख करत रोहित पवार यांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले. “2018 मध्ये प्रथम टीईटी पेपरफुटी झाली होती. अलीकडील प्रकरणातही प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर आणि सुशील खोडवेकर यांची नावे समोर आली आहेत. अभिषेक सावरीकर यांचे कोणाशी संबंध आहेत, त्यांना संरक्षण कोण देत आहे, हे तपासले पाहिजे. टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे भाजपशी संबंध असल्याचा आमचा आरोप आहे,” असे ते म्हणाले.
https://t.co/M6GQvBplZ5 — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2026






