IPL 2025: देश नाही तर पैसा मोठा! 'या' देशातील खेळाडूंनी घेतला चक्रावणारा निर्णय.. (फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारतात आता आयपीएल 2025 चा थरार सुरू होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला सुरवात होणार आहे. 25 मेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग समजली जाते. या लीगमध्ये खेळाडूं भरपूर कमाई करत असतात. त्यामुळे जगातील सर्व मोठे खेळाडू भारतात ही लीग खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हे सर्व खेळाडू आयपीएल 2025 पूर्वी खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेत आपल्या देशाकडून खेळताना दिसणार नाहीत.
आगामी आयपीएल 2025 या मालिकेसाठी सर्व खेळाडू आपापल्या संघात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या पाच स्टार खेळाडूंकडून आयपीएल 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर या खेळाडूंचा सहभाग आहे. या पाच खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागामुळे पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
क्रिकेट जगतात आयपीएलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना केवळ भरपूर पैसाच मिळत नसून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जाण्याची संधि देखील मिळते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून आधीच कळवण्यात आले होते की, हे पाच खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत उपलब्ध होणार नाहीत, कारण आयपीएलची संघटना पाकिस्तान मालिकेशी जुळून येत आहे. याशिवाय खेळाडूंचे हित आणि मनोबल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
आयपीएल 2025 साठी डेव्हॉन कॉनवे हा चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होणार आहे. तर त्याच वेळी, रचिन रवींद्र देखील आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असणार आहे. तसेच लॉकी फर्ग्युसनबद्दल हा पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार आहे. तर दुसरीकडे, मिचेल सँटनर हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर ग्लेन फिलिप्स यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स या संघाकडून खेळताना दिसणार आहे.