IPL 2025 : IPL 2025 च्या थरारापूर्वीच फलोदी सट्टेबाजी बाजाराचा धुमाकूळ; 'या' संघाला दिली विजयी पसंती(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाला एक दिवस बाकी असून 22 मार्चला पहिला सामना खेळवला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात शनिवारी संध्याकाळी खेळवण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वीच राजस्थानच्या फलोदी सट्टेबाजीने या स्पर्धेबाबत आपला अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. आयपीएल अद्याप सुरू व्हायची बाकी असताना फलोदी सट्टेबाजी बाजाराने आधीच विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या संघाचे नाव उघड केले आहे.
फलोदी सट्टेबाजीचा बाजार देशात निवडणूक आणि क्रिकेटच्या अंदाजासाठी ओळखला जातो. याआधीही दिल्ली विधानसभा निवडणुकीत अचूक भाकीत करून सर्वांना धक्का दिला होता. मतमोजणीच्या एक दिवस आधी भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल, असे भाकीत बाजाराने केले होते यानी प्रत्येक्षात तसेच झाले. आता आयपीएल 2025 बाबत अंदाज बांधण्यात आला आहे.
फलोदी सत्ता बाजारने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यावेळी सनरायझर्स हैदराबाद आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची शक्यता आहे. या संघाच्या किमती बाजारात सर्वात कमी आहेत. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, ज्या संघाला जिंकण्याची जास्त संधी असते त्याच्या किमती कमी असतात असे म्हटले जाते. म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद सर्वात बलाढ्य मानलं जाता आहे. ही बातमी सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना आनंद देणारी आहे.
राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टेबाजीमध्ये त्यांचा संघ तळाला असल्याची माहिती आहे. याचा अर्थ राजस्थान रॉयल्ससाठी जिंकण्याची शक्यता कमी दाखवत आहे. हा तोच संघ आहे ज्याने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम आपल्या नावे केला होता. आता त्याच्या चाहत्यांना एखाद्या चमत्काराची आशा असणार आहे.
बाजारभावाबद्दल सांगायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबाद पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा क्रमांक येतो. बाजारभावात दोन्हीच्या किमती समान आहेत. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा नंबर लागतो. तर राजस्थान रॉयल्स हा शेवटचा संघ आहे.
हेही वाचा : Vinod Kambali : विनोद कांबळी भक्ति मार्गाला, वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात केली पूजा-अर्चा..
त्यामुळे आता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरणार का? असा प्रश्न पडू लागला आहे किंवा काही संघ बाजार चुकीचा ठरवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीप : नवराष्ट्र टीम बेटिंग मार्केटच्या दाव्यांवर कधीही विश्वास ठेवत नाही.