इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका (फोटो- ians)
आजपासून सुरू होणार न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
अॅशेज मालिका हारल्यामुळे इंग्लंडसाठी महत्वाचा दौरा
जो रूट आणि बेन स्टोक्सच्या कामगिरीकडे लक्ष
ENG Vs NZ Test Cricket: आजपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्डस मैदानावर कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू झाला आहे.
ॲशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी महत्वाची असणार आहे. बेन स्टोक्स गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला असला तरी, जेकब बेथेलच्या सहभागाबाबत अद्याप साशंकता कायम आहे. ही मालिका केवळ इंग्लंडच्या प्रतिष्ठेसाठीच नाही, तर प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरणार आहे.
चेहऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स अनेक महीने क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता तो पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. संघाचे नेतृत्व त्याच्याकडे असल्याने त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेट शैलीचे जनक मानले जाणारे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम सध्या कठीण काळातून जात आहेत. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेट शैलीचे जनक मानले जाणारे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम सध्या कठीण काळातून जात आहेत. कसोटी फॉरमॅटमध्ये इंग्लंडला सलग पराभवांचा सामना करावा लागल्याने त्यांच्या नेतृत्वशैलीवर आणि रणनीतीवर कडाडून टीका होत आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची दिशा ठरवणारी असणार आहे.
ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान
सामना कुठे होणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या लॉर्डस स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता सामना सुरू होणार आहे.
सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?
भारतात या मालिकेचे अधिकृत प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्क कडे आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर हा सामना लाइव्ह पाहू शकता. मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव हे अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. सोनी लिव ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.






