फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ आज आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानशी सामना करणार आहे. भारताच्या संघाने या फायनलच्या सामन्यामध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेत दोन पराभवाना सामोरे जावे लागले आहे, या दोन्ही सामन्यामध्ये पाकिस्तानला भारताच्या संघाने पराभुत केले होते. हे दोन्ही संघ आता तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी मैदान सज्ज झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जेतेपदाची लढाई आज रात्री ८ वाजता सुरू होईल. या मोठ्या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने या हंगामात अपयशी ठरलेल्या सलामीवीर सईम अय्यूबबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्याच्या सततच्या खराब कामगिरीनंतरही, कर्णधार सलमान अली आघा असा विश्वास करतात की अय्यूब दीर्घकाळ पाकिस्तान क्रिकेटची सेवा करू शकतो आणि तो अंतिम सामन्यासारख्या मोठ्या मंचावर धावा करेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की अय्यूब भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात धावा करेल.
२०२५ च्या आशिया कप फायनलपूर्वी सलमान अली आघा यांनी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना सॅम अयुबबद्दल विचारण्यात आले, ज्याने पहिल्या सहा सामन्यांमध्ये फक्त २३ धावा केल्या होत्या. आघा म्हणाला, “सॅम अयुब हा असा खेळाडू आहे जो पुढील १० वर्षे पाकिस्तानची सेवा करू शकतो. अशा खेळाडूंना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. जरी तो सध्या फलंदाजीत योगदान देऊ शकत नसला तरी, तो त्याच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीने संघासाठी काम करत आहे. मला विश्वास आहे की तो उद्या भारताविरुद्ध धावा करेल.”
कर्णधाराच्या विधानावरून स्पष्ट होते की संघ व्यवस्थापनाचा सॅम अयुबवर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला अंतिम फेरीतही संधी दिली जाऊ शकते. हा तोच सॅम अयुब आहे जो आतापर्यंत या स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. डावखुरा फलंदाज सहा सामन्यांमध्ये फक्त २३ धावा काढला आहे आणि चार वेळा तो एकही धाव न काढता बाद झाला आहे.
Salman Ali Agha on Saim Ayub. “Saim Ayub is someone who can serve Pakistan for the next 10 years. Players like him should be backed. Even now, he contributes with his bowling and fielding, and I hope he scores tomorrow.” pic.twitter.com/JXpx8eqKuy — Sheri. (@CallMeSheri1_) September 27, 2025
भारताचा संघ आज त्याच्या बेस्ट प्लेइंग 11 सोबत उतरेल, भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या दमदार फाॅर्ममध्ये आहे. त्याने तीन सामन्यामध्ये तीन अर्धशतक झळकावले आहेत. एवढेच नव्हे तर तो आतापर्यत आशिया कप 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने 300 हून अधिक धावा या आशिया कपमध्ये केल्या आहेत.