फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने होमग्राउंड आहे. त्यामुळे दोन्ही संघाला दमदार सपोर्ट मिळणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. तर कोलकाता नाईट राइडर्सला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यांमध्ये केकेआरने दमदार कमबॅक करत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ वानखेडेवर भिडणार आहेत त्यामुळे संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
पहिल्या सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला चेन्नईने पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. कागदावर खूपच मजबूत दिसणारा एमआयचा फलंदाजी क्रम अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. रोहित शर्माची बॅट शांत झाली आहे आणि हार्दिकलाही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. गुजरातविरुद्ध सूर्यकुमार यादवने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण त्याला इतर फलंदाजांची सात मिळाली नाही. रोहित शर्मा दोन्ही सामन्यांमध्ये फेल ठरला.
It’s almost showtime in Mumbai🎬 pic.twitter.com/DGhbOKwNyX
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 30, 2025
संघाचा फलंदाज तिलक वर्माने देखील दोन्ही सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करू शकले नाही. त्याचबरोबर मागील गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विघ्नेश पुथुरला स्थान मिळाले नाही. विघ्नेश पुथुरने चेन्नईविरुद्ध सामन्यात तीन विकेट घेतले होते पण त्याला दुसऱ्या सामन्यात संधी न देण्यात कारण अस्पष्टच राहिले. मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तो संघामध्ये कधी याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दुसरीकडे, सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर केकेआर पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत. पहिल्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यांमध्ये केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कमालीची फलंदाजी केली होती पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीमध्ये चांगले योगदान करू शकला नाही पण त्याने कॅप्टन्सीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली.
2️⃣4️⃣ hours until we see you again at Wankhede, Paltan📍🏟
येताय ना? 💙🏏#MumbaiIndians #PlayLikeMumbai #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/8XFT4dSVJ3
— Mumbai Indians (@mipaltan) March 30, 2025
केकेआरच्या फलंदाजांबद्दल बोलायच झालं तर मनीष पांडे, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, रिंकू सिंह आणि सुनील नारायणे यासारखे कमालीचे फलंदाज संघामध्ये आहेत त्यामुळे यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.