फोटो सौजन्य - BCCI
राहुल द्रविड : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. T२० विश्वचषकातील आज फायनलचा सामना रंगणार आहे. यामध्ये दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघानी विश्वचषकामध्ये एकही सामना गमावलेला नाही. दक्षिण आफ्रिकेची विश्वचषकातील कामगिरी पाहता संघाने साखळी सामन्यांमध्ये सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सुपर-८ मध्ये सुद्धा बलाढ्य संघाना पराभूत करून अंतिम फेरीमध्ये जागा मिळवली आहे. तर भारतीय संघाच्या कामगिरीवर विचार केला तर भारताच्या संघाने सुद्धा अजुनपर्यत एकही सामना गमावला नाही. फक्त एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ अपराजित आहे त्यामुळे सामना नक्कीच रोमांचक होईल.
भारतीय वेळेनुसार विश्वचषकातील फायनलचा सामना २९ जून रोजी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. या सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. रोहित शर्माच्या टीमला हा अंतिम सामना पूर्ण ताकदीने जिंकायचा आहे. कारण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा फेअरवेल सामना असणार आहे.
भारताच्या संघाला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी T२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात विजयाच्या मोठ्या आशा आहेत. जर टीम इंडियाच्या गेल्या एक वर्षावर नजर टाकली तर भारतीय संघ आयसीसी स्पर्धेच्या तिन्ही फॉरमॅटच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. ज्यामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
🗣️🗣️“𝐅𝐨𝐧𝐝𝐞𝐬𝐭 𝐦𝐞𝐦𝐨𝐫𝐢𝐞𝐬 𝐰𝐢𝐥𝐥 𝐛𝐞 𝐭𝐡𝐞 𝐜𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐈 𝐡𝐚𝐯𝐞 𝐛𝐮𝐢𝐥𝐭”
An eventful coaching journey in the words of #TeamIndia Head Coach Rahul Dravid, who highlights the moments created beyond the cricketing field ✨👏
𝘾𝙤𝙢𝙞𝙣𝙜 𝙎𝙤𝙤𝙣 on… pic.twitter.com/iiSb3LxgZ1
— BCCI (@BCCI) June 28, 2024
T२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वी आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे कौतुक करताना दिसला. जिथे त्याने संघाच्या सततच्या विजयाचे कौतुक केले. द्रविड म्हणाला की, “सतत चांगले क्रिकेट खेळणे ही चांगली गोष्ट आहे असे मला वाटते. गेल्या एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ असणे आणि अंतिम फेरी गाठणे ही संघासाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे खेळाडूंना खूप सन्मान मिळतो. कसोटी, एकदिवसीय आणि T-२०, प्रत्येक फॉरमॅटमध्ये आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, ही भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे, जर आम्ही चांगले खेळलो आणि थोडे भाग्य आमच्या बाजूने असेल तर आम्ही जिंकू.