सौजन्य - ICC AUS vs IND 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम; कोहली-धोनीच्या यादीत झाला समावेश
Rohit Sharma Retirement : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मादेखील दोन्ही डावांमध्ये सपशेल अपयशी ठरला. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार आहे. सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. सिडनी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना पूर्ण पाच दिवस चालला तर 7 जानेवारी हा रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवटचा दिवस ठरू शकतो.
रोहितची सिडनीत शेवटची कसोटी?
BCCI आणि निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा निवडकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे. रोहित शर्माला खरंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे, जर टीम भारतात पोहोचली तर तो मॅच त्याचा शेवटचा मॅच असू शकतो. ही शक्यता कमी असली तरी अशा परिस्थितीत सिडनी हा रोहितचा शेवटचा कसोटी सामना ठरू शकतो.
टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव
मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मावरील हा अहवाल मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर लगेचच समोर आला आहे. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. एक काळ असा होता की, टीम इंडियाला ही टेस्ट ड्रॉ करता आली असती. चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारतीय संघाच्या केवळ 3 विकेट्स पडल्या होत्या पण यानंतर ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला आणि त्यानंतर भारतीय डाव पत्त्याच्या घरासारखा कोसळला. यशस्वी जयस्वालने 84 धावांची खेळी केली.
रोहित शर्माची लाजिरवाणी कामगिरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माचा परफॉर्मन्स अत्यंत खराब चालला आहे. या मालिकेत या खेळाडूला 3 सामन्यात केवळ 31 धावा करता आल्या. रोहितची फलंदाजीची सरासरी ६.२० आहे. रोहित क्रीजवर टिकून राहण्यासाठी झगडत आहे. मेलबर्न कसोटीत त्याचा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडला. केएल राहुलला ओपनिंगमधून काढून टाकून त्याने ती जागा घेतली आणि ना तो चालला आणि ना केएल राहुल धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना केएल राहुल दोन्ही डावात अपयशी ठरला. रोहित शर्माची फलंदाजी पाहता त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये फारसा वेळ उरलेला नाही असे दिसते. त्यामुळेच आता त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.