आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
Indian Cricket Team : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक पुन्हा व्यस्त होणार आहे. अशातच आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे पुढील चक्र देखील सुरू होईल.
इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर, भारतीय संघ वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवणार आहे. भारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीत आणि दुसरा सामना कोलकाता येथे खेळेल. टीम इंडिया २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान मोहालीत वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवेल, तर दुसरा सामना १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.
हेही वाचा : Video Viral : पहिल्या सामन्यापूर्वीच KKR ला ‘किंग’ खानचा संदेश; ‘या’ सिनेमाची करून दिली आठवण..
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताने गेल्या ८ महिन्यांत दोन विजेतेपदांना गवसणी घातली आहे. भारतीय संघाने नुकतेच दुबईमध्ये शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. त्याआधी टीम इंडियाने टी-२० जेतेपद देखील पटकावले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या समाप्तीनंतर भारतीय संघ खेळाच्या सर्वात लांब स्वरूपात खेळण्यास सुरुवात करणार आहे. भारताला इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारत आपले वर्चस्व कायम राखणार का? याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
यावेळी भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही आपला झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग दोन वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यापासून थोड्याशाणे हुकला. अंतिम सामन्यात भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. आणि दुसऱ्यांदा त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी मात्र भारतीय संघ अशा चुकांपासून सावधान राहील.
हेही वाचा : पहिल्या सीझनपासून आयपीएल खेळणारे 9 प्लेयर्स, 3 खेळाडूंच्या हातात अद्याप एकही ट्रॉफी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ११ जून रोजी इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे खेळला जणाराया आहे. यावेळी जेतेपदाची लढाई दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात असणार आहे.