ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू (Photo Credit- ICC/X
तिकिटांची विक्री सुरू
भारतातील ५ शहरांमध्ये आणि श्रीलंकेतील ३ मैदानांवर या मेगा-इव्हेंटचे सामने खेळवले जातील. आता ICC ने T20 वर्ल्ड कप २०२६ साठी सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे, ज्यात चाहत्यांच्या सोयीचा विचार करण्यात आला आहे.
🚨 ICC T20 WORLD CUP TICKETS WILL BE ON SALE FROM TODAY 🚨 pic.twitter.com/mOPpCsPbvd — Johns. (@CricCrazyJohns) December 11, 2025
फक्त १०० रुपयांत पाहा मॅचचा आनंद
T20 वर्ल्ड कप २०२६ च्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री ११ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:४५ वाजता सुरू झाली आहे. ICC ने जाहीर केल्यानुसार, सर्वात कमी तिकिटाची किंमत फक्त १०० रुपये ठेवण्यात आली आहे. अधिकाधिक चाहत्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांसाठी सर्वात कमी तिकिटाची किंमत १००० श्रीलंकन रुपये आहे.
तिकीट खरेदी: चाहते https://tickets.cricketworldcup.com या लिंकवर क्लिक करून आपल्या आवडत्या सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात.
सध्या ग्रुप मॅचची विक्री: सध्या ICC ने केवळ ग्रुप (साखळी) सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे.
५५ सामने, २० संघांचा सहभाग
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदी खेळल्या जाणाऱ्या या T20 वर्ल्ड कपमध्ये एकूण २० संघ भाग घेणार आहेत, ज्यात अंतिम सामन्यासह एकूण ५५ सामने खेळले जातील.
भारत-पाक महामुकाबला
सर्वांत जास्त लक्ष लागून राहिलेला सामना म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. या सामन्याच्या तिकिटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्याव्यतिरिक्त इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांसारखे मोठे सामनेही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.






