Black Sea मध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांनी तांडव; ५ भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाकडून मोठी अॅडव्हायझरी जारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या घनघोर युद्धाची झळ आता आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि तेथे कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांना बसू लागली आहे. काळ्या समुद्रातील (Black Sea) सुरक्षा परिस्थिती अत्यंत स्फोटक आणि गंभीर बनली असून, गेल्या काही महिन्यांत व्यापारी जहाजांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये तब्बल ५ भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्राणघातक घटनांनंतर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs) अत्यंत सतर्क झाले असून, रविवारी (२६ जुलै २०२६) काळ्या समुद्राच्या हद्दीत काम करणाऱ्या किंवा तेथे जाण्याच्या तयारीत असलेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा सल्लागार सूचना (Travel and Safety Advisory) जारी करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०२६ पासून काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावर क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन्सचे सावट पसरले आहे. व्यापारी जहाजे ही कोणत्याही लष्करी संघर्षाचा भाग नसतानाही, या युद्धात ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून निष्पाप नागरी खलाशांच्या सुरक्षेबाबत जागतिक स्तरावर आणि संबंधित देशांकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने काळ्या समुद्राच्या प्रदेशात किंवा त्या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर नोकरी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही जहाजावर काम स्वीकारण्यापूर्वी खलाशांनी तिथल्या सुरक्षेचे काटेकोर मूल्यांकन केले पाहिजे. नोकरी देणारी एजन्सी (Recruitment Agency), कंपनी किंवा जहाज चालकाकडून खालील गोष्टींची सविस्तर माहिती घेणे आता बंधनकारक मानले जावे:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट
परराष्ट्र मंत्रालयाने सर्व खलाशांना आपल्या प्रवासाचे वेळापत्रक आणि जहाजाची माहिती आपल्या कुटुंबासोबत सातत्याने शेअर करण्याचे आणि त्यांच्या नियमित संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सागरी प्रशासन महासंचालनालयाने (DGMA) २३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या तातडीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Advisory for Indian nationals undertaking employment on commercial vessels operating in Black Sea region ⬇️ 🔗 https://t.co/0W6Hytj67T pic.twitter.com/UbL6Bln05m — Randhir Jaiswal (@MEAIndia) July 26, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात
युद्धग्रस्त भागात किंवा काळ्या समुद्राच्या हद्दीत अडकलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला तातडीने मदत हवी असल्यास, संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने खालील आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत:
जागतिक व्यापारी जहाजांवर काम करणाऱ्या एकूण खलाशांपैकी १० टक्क्यांहून अधिक योगदान भारतीय खलाशांचे आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत भारतीय नागरिकांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य असून, नागरिकांनी स्वतःहून कोणताही धोका पत्करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.






