ट्रम्प यांची मुलगी टिफनी ८ वर्षांनंतर भारताला भेट देणार; तिचे सौंदर्य सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकते ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump Daughter Akshardham Temple : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कुटुंबाची भारताशी असलेली जवळीक जगजाहीर आहे. आता पुन्हा एकदा ट्रम्प कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याच्या भारत भेटीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अतिशय देखणी आणि ग्लॅमरस कन्या टिफनी ट्रम्प (Tiffany Trump) तब्बल ८ वर्षांनंतर अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आली आहे. ती एकटी नसून तिचे पती मायकल बोलस (Michael Boulos) देखील या दौऱ्यात तिच्यासोबत आहेत. त्यांच्या या अचानक झालेल्या भारत भेटीमुळे आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे सध्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
टिफनी ट्रम्प यांचे शुक्रवारी भारताची राजधानी दिल्लीत अत्यंत दिमाखात आगमन झाले. भारतात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी नवी दिल्लीतील जागतिक कीर्तीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान टिफनी आणि तिचे पती मायकल यांनी मंदिराची अद्भुत वास्तुकला, भव्य कोरीव काम आणि तिथले अध्यात्मिक वातावरण अतिशय जवळून अनुभवले. या भेटीनंतर भारावून गेलेल्या टिफनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपले फोटो शेअर करत या दौऱ्याचे वर्णन ‘अद्भुत आणि कधीही न विसरता येणारा क्षण’ अशा शब्दांत केले. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या जोडप्याचे भारतात मनापासून स्वागत केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Abbottabad Terror Camps: अॅबोटाबाद दहशतीचे नवे केंद्र; ऑपरेशन सिंदूरनंतर लश्कर-ए-तैबाचा हाफिजच्या मेहुण्यासोबत पुन्हा मोठा कट
अक्षरधाम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर टिफनी रविवारी सकाळी थेट प्रेमाचे प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताजमहालला पोहोचली. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये टिफनी आणि मायकल यांनी ताजमहालच्या मुख्य परिसराला भेट दिली आणि डायना बेंचवर बसून मनसोक्त फोटो काढले. टिफनीने पांढऱ्या संगमरवरी वास्तूचे सौंदर्य जवळून अनुभवताना त्याचे इतिहास जाणून घेतला. त्यांनी येथे साधारणपणे दीड तास घालवला. विशेष म्हणजे, यापूर्वी २०१८ मध्ये टिफनीने आपले वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पहिल्यांदा भारताला भेट दिली होती आणि त्यानंतर २०२० मध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनीही ताजमहालला भेट देऊन त्याला ‘शाश्वत प्रेमाचे प्रतीक’ म्हटले होते.
In our own country, some target Sanatan Dharma, trying to undermine or malign it. Yet under PM Modi’s leadership, interest in Sanatan is soaring worldwide. A shining example: American President Donald Trump’s daughter Tiffany Trump visited Delhi’s Akshardham Temple, praising its… pic.twitter.com/v5BwK97V9C — The Frustrated Indian (@FrustIndian) May 30, 2026
credit – social media and Twitter
आग्रा येथील ताजमहालची भेट पूर्ण केल्यानंतर टिफनी ट्रम्प दुपारी आग्राच्या खेरिया विमानतळावरून विशेष विमानाने राजस्थानमधील वाळवंटी सौंदर्य लाभलेल्या जैसलमेर शहराकडे रवाना झाल्या. जैसलमेरमधील ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि तिथली संस्कृती अनुभवण्यासाठी त्या जात असल्याचे समजते. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या जैसलमेरमधील मुक्कामाचा आणि इतर कार्यक्रमांचा अधिकृत तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे. टिफनीच्या या दौऱ्यामुळे राजस्थान पर्यटनाला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार
टिफनी ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची माजी पत्नी मार्ला मॅपल्स यांची मुलगी आहे. ती डोनाल्ड ट्रम्प यांचे चौथे अपत्य असून ती ट्रम्प कुटुंबातील सर्वात ग्लॅमरस मानली जाते. तिला डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, इव्हांका ट्रम्प, एरिक ट्रम्प आणि बॅरन ट्रम्प अशी चार सावत्र भावंडे आहेत. टिफनी ही केवळ तिच्या सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर ती उच्चशिक्षित देखील आहे. तिने २०२० मध्ये प्रतिष्ठित जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी (Law Degree) मिळवली आहे. तिने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकन-लेबनीज वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती मायकल बोलस यांच्याशी विवाह केला होता. टिफनीच्या सौंदर्याची तुलना अनेकदा हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींशी केली जाते. तिचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणारा ठरत आहे.






