Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद
२९ मे रोजी डॉसनविले येथील द रिव्हिएर येथे भारतीय वंशाचे वैमानिक डेव्ह फिझी आणि जेस्नी यांचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नासाठी जवळपास ४०० पाहुणे उपस्थि होते. लग्नानंतर नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने अटलांटाकडे रवाना झाले होते. परंतु उड्डाण केल्याच्या काही तासांतच हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.
डेव्ह फिझी भारतीय वंशाचे अमेरिकन असून ते मूळचे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लहानपनापासून डेव्ह यांना पायलट बनण्याची इच्छा होती. रिपोर्टनुसार, अपघातापूर्वी कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सध्या ते डेल्टा एअर लाइन्समधघ्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होते.
कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, डेव्ह अत्यंत शिस्तप्रिय, जबाबदार आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ होते. या अपघाताने डेव्ह यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या अवघ्या काही तासांतच आनंदाचे भीषण दु:खात रुपांतर झाले.
डेव्ह यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशी विवाहस्थळी दाट धुके आणि पावसाचे वातावरण होते. यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. यावर डेव्ह यांनी हेलिकॉप्टर पायलटकडे चिंताही व्यक्त केली होती. पण वैमानिकाने अधिक उंचीवरुन उड्डाण केल्यास कोणतीही अडचण येणार नाही असे म्हटले. मात्र, उड्डाण केल्याच्या काही वेळातच हॉसनव्हिलजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
अपघातानंतर हेलिकॉप्टर दाट झाडी आणि दुर्गम भागात कोसळले होते. यामुळे हेलिकॉप्टरचे अवशेषही शोधण्यात वेळ गेला ज्यामुळे बचाव कार्यात विलंब झाला. डेव्ह यांच्या पत्नी जेन्सी तब्बल सहा तास हेलिकॉप्टरच्या मलब्याखाली अडकून होत्या.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या घटनेचा तपास करत आहे. परंतु अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. येत्या ३० दिवसांत सर्व तपशील देण्यात येतील असे NTSB ने म्हटले.
Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी






