Iran Fire : इराण हादरलं! राजधानीत शॉपिंग सेंटरला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानमधील अंडीशे शहरात अरघवान शॉपिंग सेंटरमध्ये बुधवारी (०६ मे) अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळात संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये इमारतीमधनून काळ्या धूराचे लोट कित्येक किलोमीटरवरुन निघताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी शॉपिंगमॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. आग लागल्याचे समजताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु झाली. यामुळे चेंरगाचेंगरीच परिस्थिती निर्माण झाली होती.
🚨 Large fire broke out today at a commercial complex in Andishe, west of Tehran. Cause unknown per IRGC-run Fars news. Video shows intense blaze. #Iran #TehranFire pic.twitter.com/Zd7WViHv71 — The Last Best Hope of Earth (@TheLastHopeUSA) May 6, 2026
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य सुरु करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. तसेच ३६ लोक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपाचरा सुरु आहे.
सध्या आगीचे कारण अस्पष्ट असून ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. परंतु इराण(Iran) च्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा परकीय हल्ला किंवा युद्धाशी संबंधित नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या आगीत शॉपिंग मॉलमधील अनेक दुकानातील कोट्यावधींचा माल जळून खाक झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसरात बंदी करण्यात आली आहे. स्थानिक सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.






