फोटो सौजन्य: Gemini
ह्युंदाईकडून भारतीय बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून Hyundai Creta विकली जाते. या एसयूव्हीच्या मागील महिन्यात 17,838 युनिट्सची विक्री झाली. मात्र, महिन्यागणिक आधारावर विक्रीत 1.22 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत स्वस्त आणि फीचर्स जबरदस्त
मारुतीने 2025 मध्ये Victoris ही मिड-साइज एसयूव्ही लाँच केली होती. लाँचनंतर ही गाडी ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मागील महिन्यात या एसयूव्हीच्या 11,062 युनिट्सची विक्री झाली असून तिने दुसरे स्थान पटकावले आहे.
किआने जानेवारी 2026 मध्ये Seltos च्या नव्या जनरेशनला भारतीय बाजारात लाँच केलं. त्यानंतर या एसयूव्हीची मागणी आणखी वाढली आहे. मागील महिन्यात 11,041 युनिट्सची विक्री झाली असून महिन्यागणिक MoM आधारावर सुमारे 70 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
टोयोटाकडून मिड-साइज एसयूव्ही म्हणून Hyryder विकली जाते. मागील महिन्यात या कारच्या 10,206 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच MoM आधारावर तब्बल 93 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन
टाटा मोटर्सने Sierra ही मिड-साइज एसयूव्ही या सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या एसयूव्हीच्या मागील महिन्यात 9,003 युनिट्सची विक्री झाली. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या गाडीच्या डिलिव्हरीलाही सुरुवात केली आहे.






