CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस
Congress Protest: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गैरप्रकाराच्या निषेधार्थ, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने शिवतीर्थ दत्त चौक येथे गुरुवारी भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे दत्त चौक परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.
‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, ‘मोदी सरकारचा निषेध असो’, ‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला
यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील विद्यार्थी व युवक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेस खासदारांना अटक करण्यात आली. ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असून केंद्र सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार म्हणाले, नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. युवकांच्या प्रश्नांसाठी युवक काँग्रेस आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस
या आंदोलनात पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, मुबीन बागवान, उमर सय्यद यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस व एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
आमचे भविष्य सुरक्षित करा..!
आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने ‘आमचे भविष्य सुरक्षित करा’, असा फलक हातात घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांच्या मनातील असुरक्षितता आणि संताप अधोरेखित केला.






