Putin च्या दौऱ्यामुळे भारताला मिळणार बुस्टर डोस; दोन मोठे निर्णय ठरणार भारत-रशिया संबंधासाठी 'गेम चेंजर' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुतिन यांचा हा दौरा केवळ औपचारिक नसून दोन्ही देशांतील वाढत्या सहकार्याला चालना देणारा, व्यापाराला आणि धोरणात्मक संबंधांना मजबूत करण्यासाठी आहे. सध्या अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे ५०% कर लादला आहे. यामुळे भारताने सध्या रशियाकडून तेल खरेदी काही काळासाठी कमी केली आहे. मात्र या भेटीत या समस्येवर निराकरण करण्याच येण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीमुळे दोन्ही देशातील उर्जा, संरक्षण सहकार्या व्यापारा तूट, आणि राजनैतिक उपक्रमांबाबात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
भारत आणि रशिया दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध वाढवण्यासाठी कझान आणि येकातेरिनबर्गमध्ये नवीन वाणिज्य दूतावासा भारताकडून सुरु होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा रशियात काम करणाऱ्या भारतीय कामगारांना होईल. तर आणखी एक महत्त्वाचा मोठा निर्णय म्हणजे Su-57 वरही दोन्ही देशांता मोठा संरक्षण करार अपेक्षित आहे. पुतिन यांचा हा दौरा २०२१ नंतर पहिला अधिकृत भारत दौरा आहे. यामुळे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
पूतिन यांनी भारत भेटीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सल्लागार स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतली आहे. या भेटीची माहिती ते पंतप्रधान मोदींना देखील देऊ शकतील. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती.






