गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरखंड, पंजाब या पाचही राज्यातील निकाल स्पष्ट झाले असून पंजाब वगळता चारही राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. गोवामध्ये आता भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झालंय. याबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली असून ‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झाला’ असे म्हणत त्यांना गोवा निवडणुकीच्या विजयाचं क्रेडीट दिलयं.
गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी दोन जागांची गरज आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिलयं. अतिरिक्त संख्याबळासाठी वादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु केलीय. त्यामुळं आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज राज्यात सगळीकडे भाजपच्या विजयाचा जल्लोष होताना दिसतोय. मोदींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य आज मिळालेल्या विजयावर मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झालाय असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
[read_also content=”‘आता फक्त पंजाब जिंकलाय एक दिवस पूर्ण देश जिंकू’ केजरीवालांनी व्यक्त केला विश्वास https://www.navarashtra.com/assembly-election-2022/arvind-kejariwal-says-now-we-just-won-punjab-one-day-will-won-whole-nation-nrps-252653.html”]