काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव कृष्णा बाबूराव शिंदे असे आहे. पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. ती रस्त्याने जात असतांना आरोपी कृष्ण शिंदे याने तिचा पाठलाग केला. गल्लीत ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला गाठले आणि तिचा रस्ता अडवून विनयभंग केला. “आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, तू पळून जाण्यासाठी तयार राहा,” असे आरोपीने पीडितेला म्हंटले. मात्र याला पीडितेने नकार दिला. तेव्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू जर माझ्यासोबत पळून आली नाहीस तर हे सर्व फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करीन,” अशी थेट धमकीच त्याने दिली.
आरोपी कृष्णा शिंदेने याच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तात्काळ परळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.
दारू पार्टीत वाद अन् 36 वर्षीय तरुणाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव, मात्र…
बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून जिवलग मित्रांनीच 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही, तर खुनानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे आरोपींचा हा डाव फसला आणि संपूर्ण हत्याकांडाचा थरार उघडकीस आला.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली.
Ans: “माझ्याकडे तुझे फोटो आहेत, ते सोशल मीडियावर व्हायरल करीन,” अशी धमकी आरोपीने दिली.
Ans: परळी पोलिसांनी आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याला अटक केली.






