काय घडलं नेमकं?
श्याम सुभाष तांबेश्वर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने बांधकाम मिस्त्री होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून कामासाठी तो निघाला. मात्र काही वेळानंतर इच्छादेवी चौफुली परिसरातील समृद्धी चौक जवळील महामार्गालगत त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा
नातेवाईकांना घातपाताचा संशय?
श्यामची मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सकाळी व्यवस्थित कामावर गेलेला तरुण काही वेळातच मृतावस्थेत कसा आढळला, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे, मृत्यूचे नेमके कारण काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शिवशाही पुन्हा जळाली! चालकाच्या सतर्कतेमुळे बचावले ‘इतके’ प्रवासी
शिवशाही बसेसला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतानाही एसटी महामंडळाने धडा घेतला आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला मंगळवारी दुपारी धुळे शहरालगतच्या नगावबारी परिसरात भीषण आग लागली. काही क्षणांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे ४९ प्रवाशांचे प्राण वाचले, अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती.
Ans: श्याम सुभाष तांबेश्वर.
Ans: इच्छादेवी चौफुली परिसरातील समृद्धी चौकाजवळ महामार्गालगत.
Ans: घातपाताच्या संशयातून निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी.






