काय घडलं नेमकं?
कांताबाई दगडू मधे (वय 33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव दगडू अशोक मधे (वय 40) असे आहे. दगडू मधे हा पत्नी आणि चार मुलांसह ठाकरवाडी येथे राहत होता. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने मोठ्या मुली अंकिता ( १२) आणि सीमा (१०) यांना घरी ठेवले. त्यांनतर पत्नी कांताबाई आणि मुलगे शुभम (8) व हृदय (4) यांना दुचाकीवर बसवून गुजरदरी येथील सासरवाडीकडे निघाला. कळंकी घाटातील निर्जन जंगल परिसरात पोहोचल्यानंतर त्याने दुचाकी थांबवली. याच ठिकाणी पूर्वनियोजित कट रचून एका साथीदाराच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने कांताबाई यांचा गळा आवळण्यात आला. श्वास गुदमरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन चिमुकल्यांनी जंगलात घेतली धाव आणि…
आईवर सुरु असलेल्या जीवघेणा हल्ला शुभम आणि हृदय या दोन चिमुकल्या मुलांनी प्रत्यक्ष पाहिला. घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढत गाव गाठले आणि ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. हा थरार ऐकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कांताबाई यांचा मृत्यू झाला होता.
आरोपीने केले आत्मसमर्पण
घटनेनंतर आरोपी दगडू मधे याने थेट कन्नड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
Ans: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी घाट परिसरात ही घटना घडली.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Ans: आरोपी पती दगडू मधे याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.






