महिलांवरील अत्याचारावर पंतप्रधान मोदींचे मौन; काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले…

जनता दल सेक्युलरचे नेते प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या राजकीय कुटुंबाचा भाग असणे म्हणजे गुन्हेगारांच्या सुरक्षेची हमी आहे का, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली.

    नवी दिल्ली : जनता दल सेक्युलरचे नेते प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या राजकीय कुटुंबाचा भाग असणे म्हणजे गुन्हेगारांच्या सुरक्षेची हमी आहे का? अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली.

    पोलिसांनी रविवारी प्रज्वल रेवन्ना आणि त्यांचे वडील एच. डी. रेवन्ना यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला. रेवण्णाच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल

    नरेंद्र मोदींनी कर्नाटकात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर नेहमीच मौन बाळगले आहे. याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल. सर्व काही माहीत असूनही केवळ मतांसाठी शेकडो मुलींचे शोषण करणाऱ्या सैतानाला त्यांनी प्रोत्साहन का दिले? अखेर एवढा मोठा गुन्हेगार देशातून इतक्या सहजतेने कसा पळून गेला? कैसरगंजपासून कर्नाटकपर्यंत आणि उन्नावपासून उत्तराखंडपर्यंत मुलींच्या गुन्हेगारांना पंतप्रधानांचे मूक समर्थन गुन्हेगारांना धीर देत आहे.