आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
25 Sep 2025 10:15 AM (IST)
गायिका रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गुरुवारी एका इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने गोंडस मुलीला हातात धरून हा फोटो शेअर केला आहे. रिहाना तिच्या मुलाचे नाव रॉकी आयरिश मेयर्स ठेवले आहे. तसेच या फोटोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिहानाने २०२२ मध्ये तिचा प्रियकर रॉकीसोबत तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. तिने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता, २०२५ मध्ये, तिने तिच्या तिसऱ्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आहे.
25 Sep 2025 10:10 AM (IST)
नुकताच ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला आहे. पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. त्यातील एका व्हिडीओनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो व्हिडीओ आहे शाहरुख खान आणि ‘नाळ २’ चित्रपटामधील बालकलाकार भार्गव जगताप यांचा. शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचं कौतुक होताना दिसत आहे.
25 Sep 2025 10:05 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघांमधील सुरू असलेला वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय संघाने आशिया कप लीग सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सने आणि सुपर ४ सामन्यात सहा विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १४ सप्टेंबरच्या सामन्याबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी भारतीय कर्णधाराकडून उत्तर मागितले आहे.
25 Sep 2025 09:59 AM (IST)
इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे ट्रेनी इंजिनियर-I पदांसाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2025 आहे.
25 Sep 2025 09:55 AM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघीनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक हटके शो आणला आहे. या शोचं नाव आहे “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हे आहे. याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात सलमान खान आणि आमिर खान पहिले पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले आहेत. या शोमध्ये सलमानने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. आता अभिनेता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
25 Sep 2025 09:50 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:45 AM (IST)
भारतात आज 25 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,574 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,652 रुपये आहे. भारतात काल 24 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,570 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,606 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,678 रुपये होता.
25 Sep 2025 09:40 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. त्यातच क्रेडिट विभागात १०० टक्के नोकरी, हमखास २५ ते ३५ हजार पगार अशा आश्वासनांनी एका बनावट बँकिंग अकॅडमीने तब्बल २४ विद्यार्थ्यांना १५ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबर दरम्यान जवाहनगर परिसरातील चेतक घोडा चौकात घडला.
25 Sep 2025 09:36 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच आता पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
25 Sep 2025 09:13 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:03 AM (IST)
जागतिक बाजारातील कमकुवतपणा लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज २५ सप्टेंबर रोजी देखील घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात तोटा वाढण्याची शक्यता आहे आणि आज शेअर बाजाराची सुरुवात नाकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता आहे.
25 Sep 2025 08:58 AM (IST)
परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा आहे. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
Marathi Breaking Live Updates : पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे. ही परिस्थिती फार काळ टिकणार नसल्याचा अंदाज आहे. कारण बंगालच्या उपसागरात सतत अनेक प्रणाली विकसित होत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील वाऱ्यांमुळे वेगाने पुढे येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमध्ये बदल दिसून येईल.
पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.