फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश
लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
फॅटी लिव्हरची लक्षणे?
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची कारणे?
लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. पित्त तयार करणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे, शरीराची स्वच्छता इत्यादी ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. हा शरीरातील सगळ्यात मोठा अंर्गत अवयव आहे. याशिवाय रक्त शुद्ध करणे, पचनक्रिया सुधारणे, आवश्यक पोषक घटक साठवून ठेवणे यांसारखी विविध कमी लिव्हर करते. पण कामाच्या धावपळीमध्ये आणि पोषक घटकांच्या अभावांमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. लिव्हरच्या कामात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. सतत प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन, धूम्रपान, वारंवार तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे फॅटी लिव्हर होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्ही फॅटी लिव्हरची लक्षणे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हर डिटॉक्स होईलल, याबद्दल जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान
लसूणमध्ये सल्फर संयुगे असतात, ज्यामुळे लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. लसूण यकृतासाठी एक उत्कृष्ट डिटॉक्सिफायिंग एजंट आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दोन कच्च्या लसूण चावून खाव्यात. तसेच जेवण बनवताना सुद्धा लसुणचा वापर करावा. लसूण खाल्ल्यामुळे केवळ लिव्हरलाच नाहीतर हृदयाला सुद्धा खूप जास्त फायदे होतात.
बीटरूट शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यायल्यास लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. कारण बीटमध्ये बीटाईन आणि नायट्रेट्स यांसारखे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास सुद्धा मदत होते. बीटसोबतच आहारात ब्लॅक कॉफी, लिंबू पाणी, अक्रोड इत्यादी पदार्थाचे सेवन करावे.
Ans: होय. विशेषतः नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) असलेल्या काही व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला आढळू शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, लसूण, हळद, बीट, लिंबूवर्गीय फळे आणि पुरेसे पाणी यांचा संतुलित आहार लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
Ans: सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहींना थकवा, पोटाच्या उजव्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा जडपणा जाणवू शकतो. निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या गरजेच्या असतात.






