Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप
Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
दमपूर-मोहदा हे जवळपास ६ हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव आहे. मात्र, एवढी मोठी लोकसंख्या असूनही गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. गावातील नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यातच पावसाचे पाणी मिसळल्याने रस्त्यांना चिखलाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नागरिकांना दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे असल्याने स्थानिक लागत नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून चिखलाची साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात अशा समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रस्त्यांची दुरवस्था आणि नात्याची साफसफाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांना दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती व नालेसफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदाराचाच यू-टर्न?
लभंगुडा येथील शाळेत परिसरातील ५० ते ६० विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल साचल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल तुडवत शाळेत पोहोचताना अनेक विद्याभ्यर्थ्यांचे पाय घसरून पडत असून, दुखापतीचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनतो आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.






