मुंबई : शिवसेनेती बंडाळी गटाने भाजपासोबत (Shivsena MLA and BJP) सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूनी टिकाना सामोरी जावे लागत आहे, त्यामुळं त्यांचे जुने जाणते सहकारी सुद्धा बंडखोर आमदारांवर टिका करत आहेत. मात्र या सर्व घडामोडींपासून दूर असलेले शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Shivsena MP Gajanan Kirtikar) गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळं त्यांची तब्येत कशी आहे, याची आस्थेनं, आपुलीकनं विचारपूस करण्यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.
[read_also content=”क्रीडा क्षेत्रातील कर वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/sports/bcci-in-tension-over-tax-hike-in-sports-sector-will-the-country-host-the-world-cup-next-year-inviting-discussions-306502.html”]
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री.@GajananKirtikar यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या.#GajananKirtikar pic.twitter.com/zMUwgLToBM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022
या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट (Tweet) करुन माहिती दिली आहे. दरम्यान शिंदे आणि किर्तीकर यांच्या भेटीनंतर गजानन कीर्तीकरही आता शिंदे गटात जाणार का, अशा चर्चांनाही सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (CM Eknath Shinde meet Shiv sena mp gajanan kirtikar “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री.@GajananKirtikar यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या.” अशा प्रकारेच ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.