
मुंबईत मनसेला युतीच्या घोषणेनंतर पहिला धक्का
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन युती जाहीर झाली आहे आणि सध्या शिवसेना आणि मनसेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईतील एक बडे नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची बातमी होती. मनसेतील मुंबईतील पश्चिम उपनगरातील एक मोठे नाव आणि विद्यार्थी चळवळीतील एक खंबीर नेतृत्त्व मानले जाणाऱ्या मनसेचा हा नेता सुधाकर तांबोळी यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात या नेत्याला स्थान देण्यात आले. याशिवाय पक्षाचे सचिव पदापासून विभागअध्यक्षांपर्यंत अनके पदे या नेतृत्त्वाने बजावली असून सोमवारी रात्री सुधाकर तांबोळी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटीबाबत कमालाची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना पक्षातील मोठे नेतृत्त्व पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने पक्षाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.पक्षात प्रवेश करतेवेळी पक्षाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे, पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आदी उपस्थित होते. सुधाकर तांबोळी गेले अनेक वर्ष मनसेमध्ये कार्यरत होते.
सुधाकर तांबोळीचा शिवेसना शिंदे पक्षात प्रवेश
25 Dec 2025 06:53 PM (IST)
Boxing Day Test History: ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी २६ डिसेंबर रोजी खेळला जाणारा कसोटी सामना बॉक्सिंग डे (Boxing Day Test) म्हणून ओळखला जातो. २६ डिसेंबर रोजी, ख्रिसमस नंतरच्या दिवशी सुरू होणारा हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन क्रिकेट परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा एक अनोखा इतिहास आहे. ख्रिसमस दरम्यान, ऑस्ट्रेलियन लोक दीर्घ सुट्टीवर असतात, ज्या दरम्यान, ख्रिश्चन परंपरेनुसार, प्रत्येकजण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात, ज्याचा उद्घाटन दुसऱ्या दिवशी, २६ डिसेंबर रोजी केले जाते. म्हणूनच याला बॉक्सिंग डे म्हणून देखील ओळखले जाते.
25 Dec 2025 06:32 PM (IST)
25 Dec 2025 06:19 PM (IST)
सावन वैश्य /नवी मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नाताळ/ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर क्लब व तत्सम आस्थापनांना पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देणारा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. मात्र तरीही नवी मुंबईतील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी न करता नाहक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप क्लब चालकांकडून करण्यात येत आहे.
25 Dec 2025 06:09 PM (IST)
MNS Raj Thackeray: राज्यात काल एका नव्या युतीचा जन्म झाल्याचे पाहायला मिळल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केली आहे. दोन्ही पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. मात्र कल युतीची घोषणा झाली आणि आज राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर तांबोळी या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
25 Dec 2025 06:01 PM (IST)
महिंद्रा लवकरच मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये आपली नवी SUV Mahindra XUV 7XO लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वी या SUV चा आणखी एक नवीन टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यामधून अनेक आकर्षक फीचर्सची माहिती समोर आली आहे.
25 Dec 2025 05:34 PM (IST)
राज्यातल्या महापालिकां निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. नुकत्याच राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या असुन त्याचे निकालही लागले आहे. आता महानगरपालिका निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे ‘मतदान कार्ड’ (Voting Card) असणे अनिवार्य आहे.
25 Dec 2025 05:12 PM (IST)
भारतीय बाजारपेठेत होंडा कार्स कॉम्पॅक्ट सेडानपासून ते मध्यम आकाराच्या एसयूव्हीपर्यंत अनेक उत्कृष्ट कार ऑफर करते. सध्या कंपनी त्यांच्या कार्सची किंमत वाढवण्याची तयारी करत आहे. कंपनी येत्या 1 जानेवारी 2026 पासून नवीन किंमती लागू करण्याची अपेक्षा आहे.रिपोर्टनुसार, कंपनी नवीन वर्षापासून वाढलेल्या इनपुट खर्चाचा भार ग्राहकांवर टाकू शकते, ज्यामुळे किंमतही वाढू शकते.
25 Dec 2025 04:50 PM (IST)
बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जुलै २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत निगडी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.या प्रकरणातील पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांकधारक व बनावट बँक खातेदार अशा २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत शरद वैद्य (वय ४४, रुणाल बहार, निगडी, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (ता. २३) याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
25 Dec 2025 04:40 PM (IST)
आज देशभरात सर्वत्र नाताळ साजरा केला जात आहे. दरम्यान ओडीशा राज्यात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले. ओडीशामध्ये आज एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत कम्युनिस्ट सेंट्रल कमिटी (मावोइस्ट)चा टॉप कमांडर गणेश उडकेला कंठस्नान घातले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. नक्षलवाद नष्ट करण्याच्या मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
25 Dec 2025 04:30 PM (IST)
येत्या २०२६ या नव्या वर्षात भारतीय शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्यांसह सणांचा देखील समावेश आहे. वर्षभरात १५ दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील.
25 Dec 2025 04:15 PM (IST)
शहापूर मुरबाड कर्जत हा राष्ट्रीय महामार्ग कशेळे गावातून जातो. त्याचवेळी उरण पनवेल नेरळ भीमाशंकर हा राज्यमार्ग देखील कशेळे गावातून जातो. त्याचवेळी कशेळे खांडस या प्रमुख जिल्हा मार्ग देखील गावातून जात असून या सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे करून बंधाकमे झाली आहेत. हि सर्व बांधकामे तोडण्यास सुरुवात झाली असून त्या निमित्ताने स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
25 Dec 2025 04:09 PM (IST)
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्करे, वनगायी आदी रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी, तर पश्चिम भागातील गवसे, इब्राहिमपूर, बुझवडे, कानूर भोगोली, पिळणी, सडेगुडवळे, यासह तालुक्यातील अडकूर, विंझणे, मोरेवाडी, सोनारवाडी, लक्कीकट्टे, हेरे, इसापूर कळसगादे, तिलारीनगर, पाटणे, तुर्केवाडी माडवळे, हाजगोळी, मोटणवाडी, वाघोत्रे, जंगमहट्टी, कोकरे, आडूरे, नागवे आदी गावातून या रानटी प्राण्यांच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांना जिवन जगणेच कठीण झाले आहे. रानटी प्राण्यांच्या भितीने शेतकरीच नव्हे तर या मार्गावरून प्रवास करताना सुध्दा भितीच्या छायेखालीच जिवमुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. जंगलात वास्तव्यास असणाऱ्या प्राण्यांनी आता अलीकडच्या काळात खेडेगावातील वाडी वस्ती, तसेच शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीच्या ठिकाणी प्रवेश केल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.
25 Dec 2025 03:50 PM (IST)
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटाप गावात संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. चिकन करी आणि पालक खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे मानले जात आहे आणि चौकशी सुरू आहे. जर अन्नातून विषबाधा खरोखरच मृत्यूचे कारण असेल, तर या दुःखद बातमीने पुन्हा एकदा एका गंभीर परंतु अनेकदा दुर्लक्षित समस्येकडे लक्ष वेधले आहे. चिकन आणि पालक दोन्हीही पौष्टिकतेने समृद्ध आहेत, परंतु जर योग्यरित्या स्वच्छ, शिजवलेले आणि साठवले नाही तर हे पदार्थ घातक ठरू शकतात.
25 Dec 2025 03:40 PM (IST)
शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगच्या नव्या संधींशी जोडण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यात विशेष ‘एआय लर्निंग वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून साकार होत असून शिक्षकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. या कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना केवळ एआयची ओळख करून देणे एवढाच नसून, अध्यापन प्रक्रियेत एआयचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल, हे सखोलपणे समजावून देणे हा आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना एआय व मशीन लर्निंगची मूलभूत माहिती, आधुनिक शिक्षणपद्धतींमध्ये एआयची भूमिका, तसेच प्रभावी एआय प्रॉम्प्ट्स तयार करण्याची कला शिकवण्यात येणार आहे. यासोबतच अध्यापन साहित्य तयार करताना, नोट्स, प्रश्नपत्रिका, सादरीकरणे आणि डिजिटल कंटेंट निर्मितीत एआयचा कसा उपयोग करता येतो, याचेही प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन दिले जाणार आहे.
25 Dec 2025 03:30 PM (IST)
Mir Yar Baloch tribute to Atal Bihari Vajpayee 2025 : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज १०१ वी जयंती. संपूर्ण भारतात आज ‘सुशासन दिन’ साजरा होत असताना, भारताच्या सीमा ओलांडून शेजारील देश पाकिस्तानमधील बलुचिस्तान(Balochistan )प्रांतातून एक अत्यंत हृदयस्पर्शी संदेश समोर आला आहे. बलुचिस्तानचे निर्वासित नेते आणि पाकिस्तानी लष्कराचे कट्टर विरोधक मीर यार बलोच यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना मानवंदना दिली आहे. ही केवळ श्रद्धांजली नसून, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी वाजपेयींचे नाव आजही किती आदराचे आहे, याचे जिवंत उदाहरण आहे.
25 Dec 2025 03:20 PM (IST)
हिवाळ्याचा ऋतू अनेक आजारांना आमंत्रण देतो. याकाळात सर्दी, खोकला असे आजर फार सामान्य आहेत. अनेकदा आजार दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाण्याचा पर्याय निवडतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सामान्य आजार हे घरगुती उपायाच्या मदतीनेही दूर करता येऊ शकतात. चला खोकला दूर करण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांची मदत घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
25 Dec 2025 03:10 PM (IST)
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराचे अनावश्यक वजन वाढू लागते. पोटावर चरबीचा थर जमा होऊन आरोग्य बिघडते. वाढलेले वजन, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर अनेक बदल दिसू लागतात.बऱ्याचदा वजन कमी करताना वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, डाएट आणि उकडलेल्या भाज्या खाल्ल्या जातात. पण त्याच पांचट भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पेरूचे थाई स्टाईल सॅलड बनवून खाऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पेरू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूमध्ये भरपूर विटामिन सी असते. याशिवाय फायबर युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना आहारात पेरू खावा. चला तर जाणून घेऊया थाई स्टाईल पेरूचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.
25 Dec 2025 03:00 PM (IST)
Fun Fact About Christmas : आज जगभरात ख्रिसमचा आनंद सुरु आहे. अनेकजण सांता क्लॉजची वाट पाहत आहेत. लहान मुलांचा तर हा आवडता सण असतो. कारण या दिवशी त्यांना लाल ड्रेस, पांढरी दाढी, लाल टोपी च्या वेशात सांता क्लॉज येतात आणि मुलांना त्यांच्या आवडीचे गिफ्ट मिळते. पण एक देश असा आहे जिथे आज नाही, तर ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो. आज आपण असा कोणात देश आहे आणि त्यामागाची परंपरा काय आहे हे जाणून घेणार आह...
वाचा सविस्तर
25 Dec 2025 02:55 PM (IST)
जागतिक राजकारणात भारत (India), चीन (China) आणि अमेरिका (America) या तीन देशांमधील संबंधांनी आता एक नवे वळण घेतले आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ने नुकताच अमेरिकन काँग्रेसला एक खळबळजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालात चीनच्या भारताबाबतच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालामुळे चीन प्रचंड संतापला असून, अमेरिकेने भारतासोबतचे आमचे संबंध बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक हा खोटा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप चीनने केला आहे.
25 Dec 2025 02:50 PM (IST)
लोटे औद्योगिक वसाहतीतील (MIDC) लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने इटलीतील बंदी असलेल्या कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरात आणले असल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या पोस्टच्या भडिमारामुळे संपूर्ण कोकणची झोप उडाली आहे. यावर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर बंदीचा निर्णय घेऊ, असे सांगितलेले असतानाच सोमवारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मुंबईतील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लोटेत दाखल होऊन चौकशी सुरू केली आहे.
25 Dec 2025 02:45 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे, या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवल्यानंतर भारताचा संघ आता मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
25 Dec 2025 02:40 PM (IST)
दरवर्षी, भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नाताळाचा सण साजरा केला जातो. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी नाताळचा सण येतो. नाताळाचा सण हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. ख्रिश्चन लोक हा सण प्रभु येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. यादरम्यान हिंदू धर्मात नाताळच्या दिवशी तुळशीपूजन केले जाते. हिंदू धर्मामध्ये तुळस ही केवळ वनस्पती नसून तिला आई मानले जाते. विश्वाचे रक्षक भगवान विष्णू तुळशीला खूप मान देतात.
25 Dec 2025 02:35 PM (IST)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी भयावह व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होते, तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या एक हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणार व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला आहे. सुरक्षा गार्डच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचा जीव बचावला आहे.
25 Dec 2025 02:30 PM (IST)
आज २५ डिसेंबर, संपूर्ण जग नाताळच्या आनंदात मग्न असताना आफ्रिकेतील घाना देशातून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी बातमी समोर येत आहे. स्वतःला ‘आधुनिक काळातील नोहा’ (Modern-day Noah) म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने आज पृथ्वीवर महाप्रलय येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. या दाव्याने घानामध्ये इतकी दहशत पसरली आहे की, हजारो लोक आपलं घरदार सोडून या व्यक्तीने बांधलेल्या बोटींमध्ये आश्रय घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
25 Dec 2025 02:21 PM (IST)
नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
25 Dec 2025 02:11 PM (IST)
"अवतार: फायर अँड अॅशेस" ने जगभरात चर्चा निर्माण केली आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित हा चित्रपट भारतात "धुरंधर" पेक्षा कमी कामगिरी करत असला तरी जगभरात या चित्रपटाने फक्त सहा दिवसांत रणवीर सिंगच्या चित्रपटाच्या चौपट कमाई केली आहे. व्हरायटीच्या मते, या चित्रपटाने जगभरात $४५० दशलक्ष कमाई केली आहे, म्हणजेच ₹४,०४२ कोटी चित्रपटाची कमाई झाली आहे. भारतातही हा चित्रपट स्थिर गतीने प्रगती करत आहे आणि ₹१ अब्ज क्लबमध्ये हा चित्रपट पोहचला आहे. २५ डिसेंबर, गुरुवारी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असल्याने, वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट ₹५,००० कोटींचा आकडा ओलांडेल असा अंदाज आहे.
25 Dec 2025 01:55 PM (IST)
इंग्लंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी स्टीव्ह स्मिथ परतणार आहे कारण ऑस्ट्रेलियाने त्यांच्या १२ सदस्यीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, तर नॅथन लायनच्या जागी आणलेला स्पिनर टॉड मर्फी याला संघात स्थान मिळालेले नाही. २०२१ पासून सर्वात जास्त काळ खेळलेला वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन, ज्याने खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याला परत आणण्यात आले आहे.
25 Dec 2025 01:50 PM (IST)
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेली जवळीक भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर चिंतेचा विषय असून, यावर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट न होणे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. अशी तीव्र टीका कॉंग्रेसने केली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले कौतुक या चिंतेला अधिक बळ देत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे उघडा पडला होता आणि त्याची बदनामी झाली होती.
25 Dec 2025 01:45 PM (IST)
इंटरनेटवर कॉल करण्यापासून ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, स्मार्टफोनचा वापर आता रोजच्या कामात व्हायला लागला आहे. पण, जास्त वापर आणि जड डाउनलोडिंगमुळे फोन अनेकदा स्लो आणि संथ होतात आणि कधी कधी हँग होतात. तुम्हालाही जर अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड वाढवायचा असेल, तर, काही भन्नाट टिप्स वापरून तुम्हाला ते करता येऊ शकते. चला या कोणत्या टिप्स आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.
25 Dec 2025 01:35 PM (IST)
शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय अस्थिरता आणि भारतविरोधी वक्तव्ये सध्या शिगेला पोहोचली आहेत. मात्र, राजकारणाच्या या गदारोळात बांगलादेश एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरत चालला आहे, ती म्हणजे त्यांची ‘लाईफलाईन’. बांगलादेश सध्या आपल्या विजेच्या गरजेसाठी भारतावर पूर्णपणे अवलंबून आहे. परिस्थिती अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक जरी कडक इशारा दिला, तरी बांगलादेशच्या मोठ्या भागातील वीज गुल होऊन तिथे अंधाराचे साम्राज्य पसरू शकते.
25 Dec 2025 01:25 PM (IST)
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावामध्ये अनकॅप खेळाडूंसाठी वरदान ठरले. अनकॅप खेळाडूंवर फ्रँचायझींनी करोडोंची बोली लावली, त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडला. सोशल मिडियावर आयपीएल 2026 मध्ये कोणता संघ सरप्राईझ करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२६ साठी खेळाडूंचा मिनी-लिलाव नुकताच संपला. आयपीएलचा लघु-लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झाला, ज्यामध्ये २९ परदेशी खेळाडूंसह ७७ खेळाडूंची विक्री झाली.
25 Dec 2025 01:20 PM (IST)
भारतीय लष्कराने सोशल मीडियाच्या वापराबाबतच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता, लष्करी सैनिक आणि अधिकारी इन्स्टाग्रामचा वापर अगदी मर्यादित करु शकणार आहे. यापुढे सैन अधिकारी इंस्टाग्रामचा वापर फक्त पाहण्यासाठी आणि देखरेखीसाठी करू शकतील. सैन्य अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच लाईक किंव कमेंट करू शकणार नाहीत.यामुळे सैन्यातील जवानांना इंस्टाग्राम वापरावर बंधने घालण्यात आली आहेत. सोशल मीडियाच्या वापराच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
25 Dec 2025 01:15 PM (IST)
ब्रेडच्या पाकिटात लपवून मुंबईहून बंगळुरूला कोकेनची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये समोर आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ओलाजिदे एस्थर इयानुओलुवा या २९ वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली आहे.नायजेरियन महिलेकडून १२१ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या कोकेनची किंमत अंदाजे १.२० कोटी रुपये आहे. नियमित तपासणीदरम्यान शोध लागू नये म्हणून ब्रेडच्या पाकिटात/कव्हरमध्ये कोकेन पोकळ केलेल्या डब्यांमध्ये पॅक केले होते. आरोपीने मुंबई आणि बंगळुरू दरम्यान खाजगी बसने प्रवास केल्याचे उघड झाले आहे.
25 Dec 2025 01:05 PM (IST)
आज, ख्रिसमसच्या निमित्ताने, अक्षय कुमारच्या आगामी “वेलकम टू द जंगल” या चित्रपटाची एक नवीन झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे, ज्याला “वेलकम ३” म्हणूनही ओळखले जाते. अक्षयने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. व्हिडिओ शेअर करताना असे म्हटले आहे की हा चित्रपट पुढील ख्रिसमसला, म्हणजेच २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
25 Dec 2025 01:05 PM (IST)
खाजगी क्षेत्रातील प्रमुख इंडसइंड बँकेसाठी एक मोठे आर्थिक संकट उद्भवले आहे. गंभीर फसवणूक तपास कार्यालय (SFIO) आता बँकेच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमधील अकाउंटिंग अनियमिततेची आणि परिणामी १,९६० कोटींच्या मोठ्या नुकसानाची चौकशी करेल. बँकेने स्वतः स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, त्यांना या चौकशीबाबत अधिकृत आदेश मिळाला आहे. ही बाब केवळ बँकेच्या विश्वासार्हतेलाच नव्हे तर गुंतवणूकदारांच्या विश्वासालाही एक मोठे आव्हान निर्माण करते.
25 Dec 2025 12:55 PM (IST)
प्राप्तिकर विभागाच्या कडकपणा आणि डेटा विश्लेषण देखरेखीचा महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) संशयास्पद कपातीचा दावा करणाऱ्यांना पाठवलेल्या सूचना आणि मोहिमांनंतर, १५ लाखांहून अधिक करदात्यांनी चालू कर निर्धारण वर्षासाठी (२०२५-२६) सुधारित रिटर्न दाखल केले आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या. विभागाने स्पष्टपणे इशारा दिला आहे की, रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. यानंतर, चूक दुरुस्त करण्याची संधी असेल, परंतु ती महागात पडू शकते.
25 Dec 2025 12:45 PM (IST)
भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून मजबूत व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक आवश्यक दैनंदिन वस्तूंची देवाणघेवाण करतात. परंतु देशाच्या संबंधांमधील अलिकडच्या तणावाचा आणि बांगलादेशातील अंतर्गत राजकीय परिस्थितीचा या व्यापारावर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः बांगलादेशच्या दैनंदिन जीवनाचा आधार असलेल्या भारतीय वस्तूंवर. जर पुरवठा विस्कळीत झाला तर कपड्यांपासून अन्नापर्यंतचे संकट निर्माण होऊ शकते. मग प्रश्न असा आहे की, बांगलादेश भारताकडून कोणत्या आवश्यक वस्तूंवर अवलंबून आहे? बांगलादेश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशचा ९४% भाग भारताशी सीमा सामायिक करतो, ज्याची एकूण लांबी ४,३६७ किमी आहे. म्हणूनच, व्यापार, वाहतूक आणि सुरक्षेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
25 Dec 2025 12:30 PM (IST)
भारतीय राजकारणातील ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्व, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ एका ऐतिहासिक सुवर्णक्षराची साक्षीदार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौमधील वसंत कुंज येथे ६५ एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर उभारलेल्या भव्य ‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ चे उद्घाटन करणार आहेत.
देश की महान विभूतियों की विरासत के सम्मान और संरक्षण के लिए हमारी सरकार कृतसंकल्प है। इसी कड़ी में कल दोपहर बाद करीब 2:30 बजे लखनऊ में पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की 101वीं जयंती के अवसर पर ‘राष्ट्र प्रेरणा स्थल’ के उद्घाटन का सौभाग्य मिलेगा। यहां… pic.twitter.com/ssmmeQORxF
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2025
credit : social media and Twitter
25 Dec 2025 12:15 PM (IST)
जागतिक स्तरावर वादविवादासाठी अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘ऑक्सफर्ड युनियन’मध्ये पुन्हा एकदा एका भारतीय तरुणाने तिरंग्याची शान उंचावली आहे. मुंबईत जन्मलेला कायद्याचा विद्यार्थी वीरांश भानुशाली याने भारत-पाकिस्तान संबंधांवर केलेल्या रोखठोक भाषणाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर वीरांशने डागलेले तोफगोळे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.
“This House Believes That India's Policy Towards Pakistan Is a Populist Disguise for Security Policy.”
Viraansh Bhanushali, a law student from Mumbai at the University of Oxford, delivered a compelling opposition speech in the Oxford Union debate on the motion “This House… pic.twitter.com/RWbAw5MfOv
— Augadh (@AugadhBhudeva) December 22, 2025
credit : social media and Twitter
25 Dec 2025 12:15 PM (IST)
नायजेरियात एक मोठी घटना घडली आहे. नायजेरियाच्या उत्तर-पूर्व बोर्नो राज्यात मैदुगुरी येथे ख्रिसमसच्या पहाटे एका मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे, आणि ३५ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नायजेरियात भीतीचे वातावरण पसरले आहे.
25 Dec 2025 12:05 PM (IST)
ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. ख्रिसमसच्या आनंदी वातावरणात पुन्हा एकदा हिंसेने डोकं वर काढले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे सेंट किलडा ईस्ट भागात एका यहुदीच्या कारवार फायरिंग करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून यहुंदीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. वाचा सविस्तर
25 Dec 2025 11:55 AM (IST)
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "...त्यांनी देशाच्या संसदेत अनेकदा राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी विकासाच्या नव्या दृष्टिकोनातून देशाला पुढे नेण्याचे काम केले. हे वर्ष विशेष आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, ज्यामध्ये अटलजींच्या कवितांचे पठण, त्यांच्या लेखनावर चर्चा आणि संसद व आंतरराष्ट्रीय मंचांवरील त्यांची महत्त्वाची भाषणे यांचा समावेश आहे... त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, अटलजींच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा सातत्य राखण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारने लखनौमध्ये एक राष्ट्रीय प्रेरणा स्थळ उभारले आहे. आज हे स्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केले जाईल..." असे योगी म्हणाले आहेत.
25 Dec 2025 11:45 AM (IST)
भाजपचे शासन असलेल्या छत्तीसगडमधील रायपूरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दल आणि इतर उजव्या विचारसरणीच्या गटांनी लाखो रुपयांच्या ख्रिसमसच्या सजावटीची तोडफोड केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
Bajrang Dal and other right-wing groups vandalized Christmas decorations worth lakhs at Raipur Magneto Mall in BJP-ruled Chhattisgarh. pic.twitter.com/HR9tFwUHNb
— Mohit Chauhan (@mohitlaws) December 24, 2025
25 Dec 2025 11:35 AM (IST)
कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासियांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर लिहिले आहे की, सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा! हा सण तुमच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो, आणि तुमचे जीवन प्रेम व करुणेने भरून जावो"
Merry Christmas everyone!
May this season bring joy, happiness, and prosperity, and fill your lives with love and compassion. pic.twitter.com/WUDh7AA3Ai
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 25, 2025
25 Dec 2025 11:25 AM (IST)
खासदार संजय राऊत म्हणाले की,"शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस आहेत. स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे. बापच अनौरस आहे.अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे. कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं, कोण पळवतंय ते, असा जबरी टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
25 Dec 2025 11:15 AM (IST)
र्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील गोरलाथू गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज (दि.25) गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एका खाजगी बसला ट्रकने धडक दिली. ट्रॅव्हल बसच्या झालेल्या अपघातानंतर बसला आग लागल्याने १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर
25 Dec 2025 11:08 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाताळ सणामध्ये सामील झाले आहेत. दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला. यंदाच्या वर्षी पंतप्रधान मोदी हे देखील चर्चमध्ये सामील झालेले दिसून आले. यावेळी पंतप्रधान मोदी हे खास पोषाखामध्ये चर्चमध्ये गेलेले दिसून आले.यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याचबरोबर मोदींनी चर्चमध्ये प्रार्थना देखील केली.
Here are some more glimpses from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/ta5vTyYEJU
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
25 Dec 2025 10:59 AM (IST)
भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून मजबूत व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक आवश्यक दैनंदिन वस्तूंची देवाणघेवाण करतात. परंतु देशाच्या संबंधांमधील अलिकडच्या तणावाचा आणि बांगलादेशातील अंतर्गत राजकीय परिस्थितीचा या व्यापारावर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः बांगलादेशच्या दैनंदिन जीवनाचा आधार असलेल्या भारतीय वस्तूंवर. जर पुरवठा विस्कळीत झाला तर कपड्यांपासून अन्नापर्यंतचे संकट निर्माण होऊ शकते. मग प्रश्न असा आहे की, बांगलादेश भारताकडून कोणत्या आवश्यक वस्तूंवर अवलंबून आहे? बांगलादेश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशचा ९४% भाग भारताशी सीमा सामायिक करतो, ज्याची एकूण लांबी ४,३६७ किमी आहे. म्हणूनच, व्यापार, वाहतूक आणि सुरक्षेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
25 Dec 2025 10:51 AM (IST)
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल पळवल्याच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण ताज असतानाच आता नाशिक मध्ये पण तीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने नाशिक जिल्हा आणि शहरात मात्र खळबळ माजली आहे. नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.
25 Dec 2025 10:46 AM (IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका झाली होती, या मालिकेमध्ये भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांनी ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ‘बौना’ कमेंटबद्दल त्यांची माफी मागितली होती.