व्हेनेझुएलात शक्तिशाली भूकंप; 22 मजली इमारत जमीनदोस्त
25 Jun 2026 10:15 AM (IST)
दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभूच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी अभिनेत्री आई होणार असून तिने स्वतःच तिच्या आई होण्याची ही गुड बातमी सांगितली आहे. तिने आपल्या कारकिर्दीतून ब्रेक घेतल्याची घोषणाही केली आहे. समंथा रुथ प्रभूचे चाहते सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर समंथाच्या गरोदरपणाबद्दल जोरदार चर्चा सुरू असताना, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात समंथाने मौन तोडून Maternity Breakची घोषणा केली.
25 Jun 2026 10:05 AM (IST)
खासगी कंपनीच्या संचालकाचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाने बनावट संदेश पाठवत सायबर गुन्हेगारांनी कंपनीची ९८.५० लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
25 Jun 2026 09:55 AM (IST)
लोकप्रिय अभिनेत्री हिना खान तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती अनेकदा कोणत्याही विषयावर आपले मत व्यक्त करते. सध्या, पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या हत्येमुळे लोक संतप्त झाले असून आपली मते व्यक्त करत आहेत. आता हिना खाननेही केतन अग्रवाल हत्याकांडावर आपला संताप व्यक्त केला आहे. तिच्या मते, आजकाल कोणाचाही जीव घेणे खूप सोपे झाले आहे.
25 Jun 2026 09:45 AM (IST)
लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनची नियोजित वधू सियाने त्याला बोलण्यात गुंतवून निर्जन कड्यालगत नेले आणि दबा धरून बसलेला सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने मागाहून येत त्याला दरीत ढकलले. चेतन तेथून निघून गेला आणि मग सियाने आरडाओरडा करत पोलिसांचे म्हणणे आहे.
25 Jun 2026 09:35 AM (IST)
महाराष्ट्र विधान परिषदेतील अलीकडील निवडणुकांनंतर भाजपची ताकद आणखी वाढली असून, वरिष्ठ सभागृहात भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून प्रभावी स्थितीत पोहोचला आहे. सध्या विधान परिषदेच्या ७८ पैकी ७३ जागा भरलेल्या असून, त्यापैकी ३५ सदस्य एकट्या भाजपचे आहेत. आगामी काळात पक्षाचे संख्याबळ आणखी वाढत जाणार असल्याने विधेयक मंजूर करताना भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच मित्रपक्षांवरील त्यांचे अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
25 Jun 2026 09:25 AM (IST)
आयएएस तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून हे खाते देशभरात चर्चेत आले आहे. सरकारने या विभागाला गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भेसळीने कॅन्सरच्या आजारात वाढ झाली आहे. माल तपासणीसाठी पाठवला जातो तो अद्ययावत नाही, असे आव्हाड म्हणाले. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून २५० कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.
Marathi Breaking News Updates : जागतिक पातळीवर एक अत्यंत धक्कादायक आणि निसर्गाच्या कोपाची भीषण घटना समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला (Venezuela) देशाला निसर्गाच्या एका महाभयंकर प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर काही सेकंदांच्या अंतराने एकापाठोपाठ एक अशा दोन प्रचंड शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
रिश्टर स्केलवर या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे ७.२ आणि ७.५ इतकी मोजली गेली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, व्हेनेझुएलाच्या गेल्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासातील हा सर्वात विनाशकारी आणि मोठा भूकंप आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, पॅसिफिक महासागराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जपानमध्येही ६.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.






