मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानंतर आता मुंबै बँकेतही (Mumbai Bank) सुद्धा सत्तांतर होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबै बँकेत मजूर प्रकरणी दरेकरांवर (pravin darekar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (BJP MLA Praveen darekar is again the Chairman of Mumbai Bank) उद्या मुंबै बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई बँकेत पुन्हा कायापलट होणार असून, प्रवीण दरेकर ((BJP MLA Praveen darekar) पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
[read_also content=”भारतात अमेरिकेसारखे रस्ते होणार? काय आहे? नितीन गडकरींचा ‘बिग प्लॅन’ वाचा https://www.navarashtra.com/india/next-two-years-india-road-will-be-same-as-america-niteen-gadkari-312075.html”]
दरम्यान, मागील निवडणुकीत प्रवीण दरेकरांना शिवसेने धक्का देत महाविकास आघाडीच्या सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर प्रवीण दरेकरांवर मजूर प्रवर्गातून निवडून आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुंबै बँकेत एकूण २१ संचालक आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी ११ मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून १० संचालक आहेत. त्यामुळं दरेकरांच्या पुन्हा एकदा आशा जिंवत झाल्या आहेत.