मुंबई – प्रभू श्रीरामानंतर देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी हे चौथे व्यक्ती असल्याचे अजब विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ते म्हणाले – ‘देशाच्या राष्ट्रध्वजाच्या संरक्षणासाठी राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पदयात्रा काढत आहेत. यापूर्वी प्रभू श्रीराम कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी गेले होते. त्यानंतर शंकराचार्य व स्वामी रामदासांनी असे केले होते. आता राहुल गांधी यांच्या रुपात चौथा व्यक्ती असा पराक्रम करत आहे.’
नाना पटोलेंच्या या विधानावर भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.
पटोले म्हणाले, नाना पटोले रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते म्हणाले, धर्माचे पालन कोण करतय हे सगळ्यांनी पाहावे, असे ते म्हणाले. या देशासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्हाला सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा सम्राट पाहिजे, आणि ते राहुल गांधी आहेत.