Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या योजनेचा लाभ ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या जेष्ठ व्यक्तींना घेता येतो. असे नागरिक वैयक्तिक किंवा आपल्य जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडू शकतात. तसेच स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेल्या ५५ ते ६० वयोगटातील व्यक्ती तसेच काही निवृत्त संरक्षण कर्मचारीही यासाठी पात्र आहेत. योजनेत सुरुवातील किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.
या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून, व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते. एकदा खाते उघडल्यानंतर लागू झालेला व्याजदर संपूर्ण मुदतीसाठी कायम राहतो. तसेच आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलतीचाही लाभ मिळतो.
संयुक्त खात्यामार्फत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. अशा गुंतवणुकीवर वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळते. म्हणजेच सरासरी दरमहा सुमारे २० हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मुदतपूर्तीनंतर मूळ रक्कम काढून घेण्याचा किंवा खाते पुढील तीन वर्षांसाठी वाढविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.






