पिंपरी : देशाच्या सीमा सुरक्षीत करणारे सरकार पुन्हा एकदा २०२४ मध्ये स्थापन झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘महिला आरक्षण’’ कायदा केला. त्यामुळे लोकसभेच्या संसदेत १९१ महिला खासदार होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा सभागृहात १०० महिला आमदार होणार आहेत. त्यामुळे देशातील १४० कोटी लोकांना मोदीच पुन्हा प्रधानमंत्री हवे आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे राम मंदिर साकारात आहे. पण, मोदींना हारवण्यासाठी मुंबईत २८ पार्टी एकत्र आल्या. त्यातील एका पार्टीचा मुख्यमंत्री स्टॅलीनचा मुलगा उदयनिधी म्हणतो ‘‘या देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू’’. याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय रहाणार नाही. आत्मनिर्भर भारत करायचा असेल, तर मोदींना साथ द्या, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपातर्फे शिरुर लोकसभा मतदार संघांतर्गत ‘घर चलो अभियान’ आणि भाजपा वॉरिअर्स संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त’ भव्य रॅलीचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, ममता स्विट शेजारी, दत्तनगर-दिघी येथे करण्यात आले. या रॅलीला सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा प्रदेशसरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, निवडणूक प्रमुख महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, संयोजक विजय फुगे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी, मा. नगरसेवक, मंडलप्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, आगामी २०२४ मधील मे किंवा जून महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.‘‘कश्मिरच्या लाल चौकात मोदींनी तिरंगा फडकावला म्हणून माझं मत मोदींना आहे..’’ असे १४ वर्षांचा मुलगा सांगतो. सुमारे १ हजार १३ लोकांना आम्ही भेटलो. त्यापैकी १ हजार १२ लोक मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे म्हणतात. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील ९० टक्के लोक मोदींना मतदान करतील. या मतदार संघाचा खासदार महाराष्ट्रात सर्वांत जास्त मतांनी निवडून येईल. तो खासदार पंतप्रधान म्हणून मोदींना मतदान करेल, असा ‘वादा’ करा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ या अभिमानातून दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुढाकार घेत आहेत. त्यासाठी हातात माती घेतलेला फोटो काढावा. महाराष्ट्रातून किमान १ कोटी फोटो संकलन करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले. तसेच, माजी सैनिक संघटना आणि नाभिक समाज संघटनेने भाजपाला पाठिंबा दिला.
बावनकुळे म्हणतात ‘‘एकच वादा.. महेशदादा’’
शिरुर लोकसभा मतदार संघात लोकसभा प्रवास योजना आणि घर चलो अभियान सक्षमपणे राबवल्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांचा जाहीर सभेमध्ये ‘‘एकच वादा महेशदादा’’ असा उल्लेख करीत कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे, येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कोण जाणार? असं म्हणताचं असा उपस्थित नागरिकांनी ‘‘एकच वादा..महेशदादा..’’ असा नारा दिला. त्यावर महेश लांडगेंकडे नोंदणी करुन टाका, असे आवाहन करीत बावनकुळे यांनी आमदार लांडगे यांना किती लोकांना अयोध्येला घेवून जाणार असे विचारले. त्यावर पिंपरी-चिंचवडमधून ५ हजार नागरिकांना प्रभू श्रीराम मंदिराचे दर्शनासाठी घेवून जाणार असे सांगितले.
[blockquote content=”कोविड काळात संपूर्ण जग हादरले. पण, संपूर्ण देशाला मोफत लस देण्याची भूमिका घेतली. जगभरात लस पुरवठा केला. जगातील १४ देशांनी मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोत्कृष्ठ काम केले. त्यांच्या पाठित खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी फडणवीस यांना थांबवले. पण, इथले इथेच फेडावे लागले. आज त्यांची परिस्थिती काय आहे? ही महाराष्ट्राची जनता पाहते आहे. मुख्यमंत्रीपद गेले, पार्टी गेली, असेच हाल शरद पवारांचे आहेत. साडेतीन जिल्ह्याचे प्रधानमंत्री बनले होते. ” pic=”” name=”- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.”]