मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी मविआतील अनिल देशमुख, नवाब मलिक (Anil deshmukh and nawab Malik) आणि आता संजय राऊतांना (Sanjay Raut) अटक झालेय, त्यामुळं भाजपा बळाचा व सत्तेचा गैरवापर करतंय, असा सूर जनतेतून येतोय. त्यामुळं आता पुढील नंबर कोणाचा? अशी सध्या राजकीय वर्तुळाच सध्या चर्चा सुरु झालेय.
[read_also content=”आनंदाची बातमी! व्यावसायिकांच्या गॅस सिलेंडर दरात घट, ‘जाणून घ्या’ काय आहेत नवे दर? https://www.navarashtra.com/maharashtra/new-lpg-gas-cylinder-rate-declare-know-what-is-today-buisness-gas-cylinder-rate-310587.html”]
मविआ सरकार स्थापन करण्यात राऊतांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तसेच भाजपाला वेळोवेळी रोखठोक उत्तर देण्यात राऊत अग्रेसर होते. यामुळं स्वाभाविकच संजय राऊत हे भाजपाच्या रडावर होते, अखेर त्यांना काल ईडीनं अटक केलं. त्यामुळं आता केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय हे जनतेला सुद्धा कळलेय, यामुळं जनतेतून ईडी व भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येताहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपा व ईडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपाचा वंश कुठून सुरु झालाय? सत्तेचे दिवस फिरल्यानंतर तुमची काय अवस्था होईल बघा, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सुद्धा भाजपा कुरघोडीचे राजकारण करत असून, सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका पवारांनी केलीय. तसेच भाजपा वगळता सर्वंच पक्षातून भाजपावर टिका होत आहे.
भाजपाने किंवा सोमय्यांनी आरोप करायचे आणि मग चौकशीचा ससेमिरा व शेवटी अटक ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे, आता यावर जनतेचा सुद्धा तीव्र प्रतिक्रिया येताहेत. याआधी मविआतील अनिल देशमुख, नवाब मलिक यांना वेगवेगळ्या कारणावरुन अटक झालेय, त्यानंतर आता संजय राऊतांना अटक झालेय. त्यामुळं आता पुढील नंबर कोणत्या नेत्याचा लागणार? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.