मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केलीय. आणि आज कोर्टात (Court) हजर केलं. या सर्वं घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी जाऊन राऊत कुंटुबाची भेट घेत आपण तुमचा पाठीशी आहोत. घाबरण्याचे कारण नाही असं म्हणत राऊत कुंटुबांला धीर दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. (Uddhav Thackeray Press conference)
[read_also content=”अभिनेता सलमान खानला बंदूक मिळण्याचा मार्ग मोकळा, परवाना मिळण्यास पोलिसांकडून मान्यता https://www.navarashtra.com/movies/actor-salman-khan-will-be-get-pistal-mumbai-police-approval-for-license-310429.html”]
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते भाजप व ईडी यांच्यावर हल्लोबल करणार आहेत. देशात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. संजय राऊत यांच्या घरी कोणतेही पुरावे सापडले नसताना, अटक कशी काय केली जाऊ शकते. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळं दुपारी ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.