1995 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’ शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला. (फोटो - टीम नवराष्ट्र)
घडाळ्याच्या काट्यावर चालणारी आणि कधीही न थांबता अविरतपणे सुरु राहणारी मुंबई. मुंबई कधीही झोपत नाही किंवा थांबत नाहीत असं म्हणतात. लोकलच्या डब्यातील गर्दी ही प्रत्येक चाकरमानी व्यक्तीची कहानी व्यक्त करत असतो. मुंबईमध्ये देशभरातून लोक पैसे कमवण्यासाठी येत असतात. कारण असं म्हणतात मुंबई कोणाला उपाशी ठेवत नाही. भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराचे पूर्वीचे नाव बॉम्बे होते. पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. त्यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’ शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
04 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
04 मे रोजी जन्म दिनविशेष
04 मे रोजी मृत्यू दिनविशेष






