भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. २० षटकांच्या या स्पर्धेत १९ हाय-व्होल्टेज सामने होणार असून, यामध्ये विविध आशियाई देशांतील माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एकत्र येणार आहेत. इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स यांच्यातील सामना २ ऑगस्ट २०२६ रोजी खेळला जाईल. हा एशियन लेजेंड्स लीग २०२६ चा सहावा सामना आहे. हा सामना झांबियातील लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४:०० वाजता सुरू होईल, तर ३.३० वाजता नाणेफेक होईल. ही लीग, जी कमी वेळातच जगातील सर्वात रोमांचक लेजेंड्स क्रिकेट स्पर्धांपैकी एक बनली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंमधील महासंग्राम सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. ऑनलाइन चाहते फॅनकोड ॲपवर याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील. दोन्ही संघांचे कर्णधार दुपारी ३:३० वाजता नाणेफेक करतील आणि दिग्गज खेळाडू दुपारी ४ वाजता मैदानात उतरतील.
एशियन लेजेंड्स लीग सीझन २ मध्ये इंडियन रॉयल्स, पाकिस्तान पँथर्स, श्रीलंकन लायन्स, अफगाणिस्तान पठाण्स, बांगलादेश टायगर्स आणि रेस्ट ऑफ एशियन स्टार्स यांसारख्या विविध आशियाई देशांचे प्रतिनिधित्व करणारे फ्रँचायझी संघ सहभागी होतील. लीगच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या स्पर्धेत केवळ आशियाई देशांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल.
भारतीय संघ: शिखर धवन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषी धवन, अंबाती रायुडू, मनप्रीत गोनी, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, नमन ओझा, सुदीप त्यागी, सुरेश रैना, शाहबाज नदीम, फैज फजल, हरभजन सिंग, अनुरित सिंह, शदाब जकाती, पवन नेगी
पाकिस्तान संघ : उमर अकमल, मोहम्मद हाफीज, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ, अब्दुर रहमान, सईद अजमल, राहत अली, कामरान अकमल, शरजील खान, यासिर शाह, सामी अस्लम, शोएब मलिक, राणा नईम अन्वर, मोहम्मद इरफान, नावेद-उल-हसन, इम्रान नाझीर.
CWC 2026: एक नाही, तीन-तीन दावेदार! Neeraj Chopraची फायनलमध्ये धडक; रोहित-यशवीरचीही दमदार एन्ट्री






